करमाळासकारात्मकसोलापूर जिल्हा

नाळेवस्तीच्या शिक्षिका शिंदे यांचा ‘प्लान्ट ट्री – ब्रेथ फ्री’ उपक्रम पहिलीत दाखल विद्यार्थ्यांसह इतरांनाही केले वृक्षवाटप

करमाळा समाचार 

तालुक्यातील नाळेवस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील उपक्रमशील शिक्षिका अनुराधा शिंदे यांनी प्लान्ट ट्री – ब्रेथ फ्री हा उपक्रम राबविला आहे. या उपक्रमांतर्गत शाळेत दाखल होणाऱ्या पहिलीतील विद्यार्थ्यांसह शाळेतील इतर विद्यार्थ्यांनाही विविध वृक्षांच्या रोपांचे वाटप केले आहे.

वृक्ष लागवडीचे महत्व व गरज ओळखून शिंदे यांनी हा उपक्रम राबविला असून वृक्षभेटीने पहिलीत दाखल विद्यार्थ्यांचे स्वागत केल्याने नवागत विद्यार्थ्यांमध्ये आनंद दिसून आला.

सद्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांच्या शाळा सुरु झाल्या असल्या तरी विद्यार्थ्यांसाठी शाळा बंदच आहेत. विद्यार्थी घरीच असून त्यांचे ऑनलाईन शिक्षण सुरु आहे. अशा स्थितीत शिंदे यांनी विद्यार्थ्यांच्या घरी जावून रोपांची भेट देवून वृक्षारोपणाचे महत्व सांगितले. तसेच वृक्ष संवर्धनाचे आवाहन केले.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी शिक्षकांनी वेगवेगळे उपक्रम राबविण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी राबविलेल्या या उपक्रमाचे गटशिक्षणाधिकारी राजाराम भोंग, विस्ताराधिकारी अनिल बदे, केंद्रप्रमुख दत्तात्रय खाटमोडे यांनी कौतुक केले आहे.

सद्य काळात ऑक्सिजनचे महत्व समजून आले आहे. वृक्षसंख्या जास्त असेल तर हवेतील ऑक्सिजनचे प्रमाण योग्य राहून प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे वृक्ष लागवड, संवर्धन मोहिम गतिमान होणे, काळाची गरज आहे. असे शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE