मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडुन चिवटेंना मोठी संधी ; राज्याचा आरोग्याची धुरा चिवटेंच्या खांद्यावर
समाचार टीम –
देवेंद्र फडवणीस मुख्यमंत्री झाल्यानंतर मुख्यमंत्री सहायता कक्षाची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर सदरचा कक्ष अधिक जाचक अटीमध्ये अडकला गेला व उद्धव ठाकरे यांच्या काळात हा कक्ष बंद पडल्यागत झाला होता. त्यानंतर आता पुन्हा नव्याने सुरू होत असलेल्या या कक्षाची संपूर्ण जबाबदारी ही करमाळा तालुक्यातील मंगेश चिवटे यांच्यावर सोपवली गेल्याने करमाळ्याच्या खांद्यावर महाराष्ट्राच्या आरोग्याची धुरा सोपवल्याची दिसून येत आहे.

मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष पुन्हा एकदा गजबाजणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करमाळ्याचे मंगेश चिवटे मुख्यमंत्री कार्यालयात विशेष कार्य अधिकारी म्हणून गुरुवारी नेमणूक केली आहे. सोमवारी 25 जुलै चिवटे कक्ष प्रमुखाचा कार्यभार स्वीकारणार आहेत.

दरम्यानच्या काळात मंगेश शेवटी हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळ राहून त्यांनी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची स्थापना करण्यात मोलाचा सहभाग नोंदवला होता. त्यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या नेतृत्वाखाली हा कक्ष महाराष्ट्रात सर्वत्र काम करताना दिसत होता. यावेळी ही अनेकदा मंगेश चिवटेंचे कौतुक करण्यात आले होते. महाराष्ट्रात आरोग्य सेवा सुरळीत राहावी यासाठी कोरोणा काळात ही त्यांनी मोठ्या प्रमाणावर सेवा दिली होती त्यांचं कौतुक ही अनेक वेळा झालेलं होतं.
आता सदर कक्ष हा मुख्यमंत्री सहायता कक्ष म्हणून पुन्हा एकदा सुरू होत असताना या ठिकाणची जबाबदारी ही चिवटेंवर दिल्याने त्यांच्या कामाला न्याय मिळाल्याचे दिसून येत आहे. सदर कक्षाच्या माध्यमातून पहिल्या तीन वर्षात 28 हजार गरजू रुग्णांना 302 कोटींची मदत केली होती. तसेच 450 धर्मादाय रुग्णालयांच्या दहा टक्के राखीव घाटामध्ये 600 कोटींचे उपचार झाले होते.
तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात सदर कक्षात केवळ सरकारी अधिकारी नेमले होते. तसेच निवडक 10 गंभीर आजारांसाठी मदत देण्याच्या अटी टाकल्या होत्या. परिणामी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष असूनही निरोपयोगी होता. तसेच येणाऱ्या अर्जाची संख्या घटली होती.
विशेष म्हणजे त्यावेळी शिवसेना सत्तेत असताना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सदर कक्ष जोमात चालायला हवा पण त्या पद्धतीने चालत नसल्याने शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची स्थापना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली व ती प्रत्येक आजारावर काम करत असताना रुग्णांना सेवा देऊ लागली. त्याचं कौतुक ही मोठ्या प्रमाणावर झाले. पण शिंदेंनी ही कधीच सर्व श्रेय स्वतःला न घेता चिवटेंसारख्या प्रमुख शिलेदारांना याचे श्रेय दिलं होतं हा शिंदे यांचा मोठेपणाच मानावा लागेल.