करमाळासोलापूर जिल्हा

कंत्राटी कर्मचाऱ्याच्या मृत्यु प्रकरणातील अधिकाऱ्यावर अखेर निलंबनाची कारवाई

करमाळा समाचार

कामात कचुराई केल्याने अपघात तसेच कंपनीची परिपत्रके नियम तसेच विद्युत नियमांचे उल्लंघन करुण कार्यालयीन दस्तावेजात अनाधिकृत फेरफार करणे आढळून आल्याने संतोष प्रल्हाद मंडलिक प्रधान यंत्रचालक शाखा कंदर यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. सदर प्रकरणात कंत्राटी कर्मचारी सचिन साळुंखे हे विजेचा झटका बसून मयत झाले होते. त्यानंतर त्यासंदर्भात करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात आली आहे.

9 जानेवारी रोजी साधारण दोन वाजण्याच्या सुमारास कंदर परिसरातील रोहित्रा ची दुरुस्ती करण्यासाठी गेल्यानंतर अधिकृत परमिशन घेऊन डीपीवर चाढल्यानंतर सचिन साळुंखे यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर ग्रामस्थ यांच्या वतीने संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करत वरिष्ठ अधिकार्‍यांना घेरले होते. त्यानंतर करमाळा पोलिसात मंडलिक यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर खातेनिहाय चौकशी झाल्यानंतर इतर बाबी समोर आल्या आहेत.

संबंधित दिवशी मंडलीक हे कामावर असताना कंदर उप केंद्रातून अकरा केवी इन्कमर नंबर 2 ट्रीप करून संबंधित अकरा केवी बिटरगाव शेतीपंप मीटरचा व्हीसीबी बंद करणे आवश्यक होते व त्याचा नियमाप्रमाणे इतर बाबी करून विद्युत पुरवठा बंद करण्याचे काम मंडलिक यांचे होते. कामात कचुराई केलीच शिवाय लॉग बुक वरील नोंदी मध्येही खाडाखोड करून नोंद केलेली आहे. यंत्रचालक म्हणून जवाबदारी पूर्ण न केल्याने तसेच खाडाखोड व नियमांचे उल्लंघन केल्याने प्रथमदर्शनी दिसून आले. त्यामुळे मंडलिक यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

मंडलिक यांना निलंबन करून 50 टक्के मूळ वेतनाच्या देण्यात येणार आहेत. त्या शिवाय महागाई भत्ता घरभाडे व इतर बाबी दिल्या जाणार आहेत. त्या शिवाय आठवड्यातून दोन दिवस मुख्य कार्यालयाची हजेरी लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सदरची कारवाई अधीक्षक अभियंता तथा सक्षम अधिकारी सोलापूर ज्ञानदेव पडळकर यांनी केली आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE