रमजानच्या पार्श्वभूमीवर शहर काझी मुजाहिद यांचे मुस्लिम समाजाला आवाहन
करमाळा समाचार
करमाळा शहरातील मुस्लिम बांधवांनी रमजान संबंधी शासनाचे नियम काटेकोरपणे पाळावे असे आवाहन शहर काजी मुजाहिद काझी यांनी करमाळा शहरातील मुस्लिम बांधवांना केली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना काझी पुढे बोलताना म्हणाले, की सध्या पवित्र असा मुस्लिम धर्मीयांचा रमजानचा महिना 14 एप्रिल ला चालू झाला असून सर्व मुस्लिम बांधवांनी मशिदीमध्ये नमाज व इफ्तार न करता ज्याने त्याने आपापल्या घरीच इफ्तार व नमाज अदा करावे असे आवाहन काझी यांनी केले आहे.

सध्या महाराष्ट्र शासनाने रमजान संबंधी नवीन नियमावली काढली असून त्या नियमावलीचे पूर्णपणे पालन करमाळा शहरातील मुस्लिम बांधवांनी करावे सर्व मुस्लिम बांधवांना कळकळीचे आवाहन करण्यात येते की सर्व बांधवांनी मास्क सॅनिटायझर व सुरक्षित अंतर पाळणे महत्त्वाचे आहे. याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी व शासनाचे आदेश पाळावे असे आवाहन शेवटी काझी यांनी केले आहे.