करमाळासोलापूर जिल्हा

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे आचरण प्रत्येकाने करायला हवे सुजित बागल

करमाळा प्रतिनिधी सुनिल भोसले

मांगी येथे पंचशील बुद्धविहार येथे भारतरत्न विषवभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आपले विचार व्यक्त करताना सुजित तात्या बागल यांनी आपले विचार मांडले. जगात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारांचे करोडो अनुयायी आहेत, बाबासाहेबानी, देशाची घटना लिहिली देशाला संविधान दिले, आज जगभरातील अनेक देशातील उच्च इन्व्हर्सिटी मध्ये तेथील विद्यार्थी गळ्यात डॉ बाबासाहेबांचे फोटो असणारे लॉकेट घालतात , त्यांचे विचार त्यांचा अभ्यास करुंन ज्ञान आत्मसात करतात , जर आपल्या देशामध्ये हि तरुणाई नि डॉ आंबेकरांचे विचार आत्मसात केले.

तर नकक्कीच ,कित्येक तरुण उच्चशिक्षण घेऊन बॅरिस्टर वकील होतील ,डॉ आंबेडकरांनी जो शिक्षणाचा मार्ग दाखवून दिलाय त्यांचे मार्गाने आज प्रत्येकाने जायला हवं आजकाल कम्प्युटर व हायटेक युगात म्हणजेच 21 वे शतकात केवळ शिक्षण हाच एकमेव पर्याय आहे ,अशिक्षित लोकांची आज खूप दैनि अवस्था आहे ,आज आधूनिक तंत्रज्ञानाची प्रत्येकाला माहिती गरजेची आहे ,त्यामुळे योग्य शिक्षण घेणे खूप गरजेचे आहे ,त्यामुळे प्रत्येकान डॉ आंबेकरांचे विचारांची चालना घेऊन शिक्षण घेऊन मोठे व्हायला हवे डॉक्टर इंजिनिअर , वकील , बॅरिस्टर तरच आपण म्हणू शकतो समाज सुधारला नुसते जयंती पुरते दिखावा करून काही उपयोग नाही 12 ही महिने आंबेडकरांचे विचार आत्मसात करायला हवे मांगी येथील पंचशील बुद्धविहार कमिटीने आंबेडकर जयंती निमित्त केलेल्या नियौजनाचे विशेष कौतुक केले.

कोणताही दिखावा न करता किंवा मिरवणूक डी जे न लावता ,आज काळाची गरज ओळखून सामाजिक भान ठेवून समाज प्रबोधनाची जयंती मांगी येथे साजरी करण्यात आली ,कोरोना सारख्या माहामारी संकटाचे नियंम पाळत अतिशय साधेपणाने शिस्त बद्ध जयंती साजरी करण्यात आली त्यामुळे बागल यानी पंचशील बुद्धविहार कमिटीचे मनापासून अभिनंदन केले , इतरांनी असा आदर्श घ्यावा असे लोकांना आव्हान केले.

यानिमित्त सुजित तात्या बागल सह ,नूतन सदस्या कु स्नेहल ताई अवचर ,पै पप्पू शिंदे, जेष्ठ सुखदेव चव्हाण , अभिमान अवचर , ज्ञानदेव अवचर , विनोद कांबळे , रवि शिंदे, प्रेम चव्हाण, रोहन अवचर , अक्षय अवचर, अजय अवचर, कमिटी अध्यक्ष आयु अजिनाथ चव्हाण, उपाध्यक्ष आयु नवनाथ अवचर , सचिव शाहजी अवचर , खजिनदार महेंद्र अवचर , सेक्रेटरी संतोष बनसोडे , मार्गदर्शक प्रवीण अवचर यांचे सह कोरोना संसर्ग नियमांमुळे अगदी मोजके समाज बांधव उपस्थित होते . यानिमित्त आकर्षक रोषणाई सह सुंदर अशी रांगोळी आयु रोहन अवचर यांनी काढली होती कार्यक्रमाची सांगता बुद्ध वंदनेने करण्यात आली.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE