पहिली ते सातवी च्या वर्गाना शिकवतात केवळ दोन शिक्षक ; शाळा बंद करण्याचा पालकांचा इशारा
समाचार टीम
विज्ञान शिक्षक पदोन्नती नंतर तालुक्यातील समाजशास्त्र शिक्षकांचे समायोजन करण्यात न आल्याने शाळेच्या अडचणी सुटण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे हाल होताना दिसत आहेत. आता याचा फटका बसत असल्याने सोगाव पुर्व येथील शाळेतील विद्यार्थी शाळा बंद करण्याच्या तयारी असल्याचे पालकांच्या वतीने सांगण्यात आले आहे.

सोगाव पूर्व येथील जिल्हा परिषद शाळेत पहिली ते सातवी पर्यंतचे वर्ग आहेत. त्या ठिकाणी एकूण ६० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पण या ठिकाणी चार शिक्षक अपेक्षित असताना तीनच मंजूर झाले होते. त्यातूनही एक शिक्षक विज्ञान पदोन्नती मध्ये दुसऱ्या शाळेवर गेल्याने या शाळेवर अद्याप एकही शिक्षक दिला नसल्याने पहिली ते सातवीचे वर्ग केवळ दोन शिक्षकच हाताळत असल्याचे दिसून येत आहे.

याबाबत ग्रामपंचायत व पालकांच्या वतीने अनेकदा गटशिक्षणाधिकारी यांना विनंती करूनही त्या ठिकाणी शिक्षक दिला जात नसल्याने पालक संतप्त झाले आहे. तर आता शिक्षक न दिल्यास आंदोलनाचा पवित्रा या पालकांनी घेतला आहे.
सदर शाळेतील विद्यार्थ्यांची यातुन आतोनात नुकसान होत असून या ठिकाणी लवकरात लवकर शिक्षक नेमावा अन्यथा शाळा बंद करण्याचा इशारा आता पालक देऊ लागले आहे. याबाबत ते लवकरच गटशिक्षणाधिकारी व गटविकास अधिकारी यांच्याशी भेट घेऊन मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करणार आहे. शाळा बंद करण्यात येईल असेही यावेळी सांगण्यात आले आहे.