Video – करमाळा तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस ; केमचा संपर्क तुटला
समाचार टीम
करमाळा तालुक्यातील केम गावाच्य आजूबाजूच्या दहा ते पंधरा गावाचा रात्री झालेला अचानक अतिवृष्टी पावसामुळे संपर्क तुटला आहे. केम गावाला जोडणाऱ्या चारी बाजूचे रस्त्यावर पाणीच पाणी झाले व रेल्वे पुलाखालील रस्ता पाण्याने वाहत असल्याने त्यामुळे उड्डाणपूलाची मागणी करून देखील आजतागायत त्या उड्डाणपुलाला यश आलेले नाही. त्यामुळे केम गावातील जिल्हा परिषद शाळा व हायस्कूल व इतर शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. तसेच शेतकऱ्यांचे पिकांचे भयंकर नुकसान झाले आहे.

किराणा दुकानातील किराणामाल, कृषी दुकानातील खत वाहून गेली आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर साहेब व महाराष्ट्र शासनाला विनंती आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना विनंती आहे. त्वरित पंचनामे चे आदेश देऊन नुकसान भरपाई जाहीर करावी ही विनंती. प्रहार जनशक्ती पक्ष करमाळा तालुका अध्यक्ष संदीप भाऊ तळेकर यांनी केली आहे.

यावेळी उपस्थित केम गावातील शेतकरी ग्रामस्थ व्यापारी दुकानदार प्रहार जनशक्ती पक्षाचे करमाळा तालुका अध्यक्ष संदीप भाऊ तळेकर संपर्कप्रमुख सागर भाऊ पवार करमाळा तालुका भाजप सरचिटणीस धनंजय ताकमोगे युवा नेते सचिन रणशिंगारे शेतकरी नेते परमेश्वर तळेकर प्रहार जिल्हा युवा उपाध्यक्ष युनूस पठाण सचिव प्रवीण मखरे गणेश गुरव सोमनाथ देवकर आदि उपस्थित होते.