स्नेह ग्रुपच्या वतीने कोव्हीड तिसऱ्या लाटे बाबत ऑनलाईन मार्गदर्शन
करमाळा/ प्रतिनिधी
सावडी (ता.करमाळा) येथील स्नेह ग्रुपच्या वतीने कोव्हीड तिसऱ्या लाटे बाबत ऑनलाईन मार्गदर्शन काल (ता.18)आयोजित केले होते. यात 200 ग्रामस्थांनी सहभाग घेतला.

यासाठी सावडी गावातीलच बीजे मेडिकल सारख्या नामांकित वैद्यकीय संस्थे मधून एमबीबीएस चे शिक्षण घेतलेले व एमडी झालेले आणि सध्या पुण्यात डॉ.जाधव चाईल्ड केअर चे डायरेक्टर असलेले वक्ते डॉ. नवनाथ जाधव यांनी मार्गदर्शन केले. यावेळी ग्रामस्थांनी विचारलेल्या शंकाला डाॅ. जाधव यांनी उत्तरे दिली.

कार्यक्रम सूत्रसंचालन मुंबई येथील गॅलेक्सी फार्मासिटिकल कंपनीतील मॅनेजर केशव शेळके यांनी केले. गावातून लहान मुलांच्या पालकांची संपर्क व नाव नोंदणी आजिनाथ चव्हाण, मेजर अमोल एकाड, दिगंबर मचाले, नवनाथ शिंदे, राहुल तळेकर. शाम वालेकर भाऊसाहेब, प्रा. सोमनाथ पाटील यांनी केली. या संपूर्ण ऑनलाईन कार्यशाळेचे सुयोग्य नियोजन उद्योजक अभियंता आनंदजी अब्बड यांनी केले.
स्नेह ग्रुपच्या वतीने यापूर्वी कोविड काळात कोविड सेंटर मधील समाजसेवकांचा दहा लाख रुपयेचा आरोग्य विमा , गावात गरजू कुटूंबाना अन्नधान्याचे वाटप ,वैद्यकीय मदत केली, वृक्षारोपण केले आहे या सारखी लोकहिताची कामे या संघटनेकडून केली आहेत.