श्री संत रोहिदास महाराज जयंती कात्रज येथे संपन्न
करमाळा समाचार
शनिवारी सकाळी श्री संत रोहिदास महाराज यांची जयंती साजरी करतेवेळी कोविड 19 चा प्रादुर्भाव पाहता साध्या पद्धतीने व मोजक्या मान्यवरांचा उपस्थित कात्रज (कांचनपूर) नगरीत साजरी करण्यात आली.

यावेळी आजिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक किरण(काका) कवडे यांनी श्री संत रोहिदास महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून आपले मनोगत व्यक्त केले. तसेच जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचा आनंद कात्रज करांनी घेतला.

या वेळी कृषी उत्पन्न बाजार समिती करमाळा माजी संचालक नागनाथ( शेठ) लकडे, जनार्दन शेंडगे, ह ,भ ,प , हनुमंत मारकड महाराज, साहेबराव शिंदे, माजी उपसरपंच कात्रज राजेंद्र वावरे, अजय शिंदे, ऋषिकेश शिंदे, सचिन शिंदे, नंदकिशोर शिंदे, पप्पू शिंदे, शांतीलाल शिंदे, ज्ञानेश्वर शिंदे, धनराज शिंदे, अमित शिंदे, किरण शिंदे, गोकुळ शिंदे, हनुमंत चव्हाण, दत्तात्रय शिंदे व संत रोहिदास तरुण मंडळाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.