बिबट्याच्या संख्येवरुन तालुक्यात सभ्रम ; बिबट्याची संख्या एक पेक्षा जास्त असण्याची शक्यता !
करमाळा समाचार
तालुक्यात आतापर्यंत बिबट्याने तीन बळी घेतले आहेत. तर नरभक्षक बिबट्याचा पाठलाग करत असतानाच आणखीनही दुसरीकडे बिबट्या दिसून आला आहे. यातूनही समाधानकारक बाब म्हणजे झालेले सर्व हल्ले एकच बिबट्याने केले असल्याने इतर बिबट पासुन येवढा धोका नाही. आता पर्यत नरभक्षक झालेले सर्व हल्ले एकच बिबट्याने केले आहेत. त्यामुळे तालुक्यात एकच नरभक्षक बिबट्या आणि त्यालाच ताब्यात घेणे किंवा ठार मारणे हे आव्हान बनले आहे.

संपूर्ण यंत्रणा चिखलठाण येथे बिबट्याला पकडण्यासाठी गेलेली असताना भोसे परिसरात बिबट्या दिसल्याबाबत नागरिकांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. यासंबंधी वन विभागाचे अधिकारी साळुंखे यांना संपर्कही करण्यात आला होता. पण संपूर्ण यंत्रणा चिखलठाण परिसरात असल्याने सध्या भोसे परिसरात येऊ शकत नाही अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की नरभक्षक बिबट्यासह इतरही ठिकाणी बिबट्या आहेत. त्यामुळे प्रत्येकच बिबट्या हा नागरिक नागरिकांवर हल्ले करतो असे नाही. त्यामुळे बिबट्या दिसून आल्यास न घाबरता त्याची माहिती प्रशासनाला दिल्यानंतर इतरही गावात सूचना द्यावी घाबरून जाऊ नये.

जिंती, भिलारवाडी या तालुक्याच्या पश्चिम भागात यापूर्वीही बिबट्याने हल्ला केल्याच्या चर्चा होत्या. पण तो बिबट्या नागरिकांवर हल्ले करत नव्हता. त्यामुळे त्या बिबट्यावर येवढ्या मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्याची परिस्थिती नव्हती. पण सध्या या नरभक्षक बिबट्याने आतापर्यंत तीन जणांना बळी केलं आहे. तर अजूनही तो भुकेला असून नवीन शिकारीच्या शोधात आहे. वेगवेगळ्या ठिकाणाहून बिबट्याला पाटलाग केल्याबाबत वृत्त आले. पण त्यातील नेमका नरभक्षक बिबट्या कोणता आता समजून घेऊन त्याच्याच मागे लागणे हे मोठे आव्हान व विभागापुढे असणार आहे.