करमाळासोलापूर जिल्हा

बिबट्याच्या पार्श्वभूमीवर खा. रणजीतसिंह निंबाळकर यांची करमाळा येथे भेट ; शोध कामासाठी हेलिकॉप्टरचे आश्वासन

करमाळा समाचार 

करमाळा तालुक्यात बिबट्याने थैमान घातल्यानंतर आता त्याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. या दरम्यान माढा चे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी करमाळा येथे भेट दिली व फुंदेवाडी, चिखलठाण व अंजनडोह येथील परिवाराची भेट घेऊन वनविभागाकडून उचित अशी मदत करण्याचे आश्वासन दिले. तर वन विभागाला परिसरात पाहणी करण्यासाठी हवेच्या मार्गाने ही पर्याय उपलब्ध आहे. त्या वेळी हेलिकॅप्टर देण्याची आश्वासन रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिले आहे.

चिखलठाण परिसरात बिबट्याने हल्ला केल्यानंतर एका नऊ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आज माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी घटनास्थळाची पाहणी करत संबंधित कुटुंबाला भेट दिली. तर अधिकाऱ्यांशी चर्चा करताना उसाचे क्षेत्र तसेच पाण्याचे क्षेत्रामुळे अनेक अडचणी येत आहेत. त्या अडचणी दूर करण्यासाठी शासनाने हेलिकॉप्टर ची सोय करावी. तसे करता येत नसेल, अडचणी येत असतील तर आम्ही खाजगी हेलिकॉप्टरची सुविधा पुरवण्याची सोय करू असे आश्वासन दिले.

तसेच गरज भासल्यास एनडीआरएफचे पथकही करमाळा तालुक्यात बोलून घेऊ आवश्यक परवानग्या वन विभागाच्या वतीने करून घ्याव्यात त्यानंतर त्यांना २४ तासाच्या आत हेलिकॉप्टर देण्याची सोय करण्यात येईल असेही निंबाळकर म्हणाले. यावेळी माजी आमदार नारायण पाटील, तालुकाध्यक्ष गणेश चिवटे, शहराध्यक्ष जगदिश अगरवाल उपस्थित होते.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE