सोलापूर जिल्हा नियोजन समितीत चिवटे यांची निवड झाल्याबद्दल सत्कार
करमाळा –
सोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या DPDC भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष गणेश(भाऊ)चिवटे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार श्री.मकाई सहकारी साखर कारखान्याचे ऊस पुरवठा अधिकारी मा.श्री.मल्हारी मारकडसाहेब यांचे हस्ते करण्यात आला तसेच वाशिंबे ग्रामपंचायतचे नुतन उपसरपंच अमोल पवार यांचा सत्कार मा.कैलास नाळे यांनी केला.

मा.पै.अफसर(तात्या)जाधव यांचा सत्कार मा.अक्षय भुजबळ यांनी केला त्याच प्रमाणाने विहाळ गावचे नूतन सदस्य मा.संजय भुजबळ,मा.चि.शिवाजी नाळे यांचा सत्कार मा.गणेश(भाऊ)चिवटे, मा.अफसर(तात्या)जाधव, उपसरपंच मा.अमोल पवार यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक सोलापूर जिल्हा आर. पी. आय. उपाध्यक्ष मा.श्री.अर्जुनराव गाडे यांनी केले.

कार्यक्रमाला उपस्थिती युवानेते मा.दादा गाडे,पै समाधान मारकड, मा.गणेश युवराज नाळे, गणेश हनुमंत नाळे,अच्युत नाळे, सुजित बंडगर, जीवन बंडगर, समाधान गाडे, अशोक बंडगर, अशोक गाडे, दयानंद गाडे, नवनाथ मारकड,विकास पांढरे, विशाल मारकड, बाबासाहेब कांबळे,दत्ता नाळे, सागर काळे, सचिन शिंगाडे, शिवाजी चांदणे,नानासाहेब देवकाते व विहाळ गावातील सर्व मान्यवर उपस्थित होते.