अधिवेशन तारांकीत प्रश्न – काळ्या यादीतील कंपनीला कंत्राट ; बचत गटातील महिलांच्या रोजगाराचा प्रश्नाला फोडली वाचा
प्रतिनिधी – करमाळा
महाराष्ट्र विधिमंडळाचे अधिवेशन सध्या सुरू असून या अधिवेशनामध्ये लोकप्रतिनिधींकडून वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले जातात. बालकांच्या व गर्भवती स्त्रियांच्या पोषण आहार संदर्भात आमदार शिंदे यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला आहे. प्रश्न क्रमांक 20954 हा तारांकित प्रश्न होता.

पोषण आहार शिजवण्याचे 11 वर्षापासूनचे कंत्राट अचानक बंद झाल्यामुळे राज्यातील हजारो बचत गटातील महिलावर उपासमारीची वेळ आली आहे. हे कंत्राट एका कंपनीला मिळाले असल्याने खासगीकरणाची शक्यता आहे. बचत गटांना कुठलीही पूर्वसूचना न देता अंगणवाडीतील गरम आहार बंद केलाआहे. विशेष म्हणजे ज्या महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह स्टेट फाउंडेशन ला हे काम दिले आहे ती संस्था काळ्या यादीतील आहे. या निर्णयामुळे महिला बचत गटातील महिलांचा रोजगार हिरावला असून या महिलावरती उपासमारीची वेळ आलेली आहे.

महिला बचत गट हे महिलांच्या आर्थिक स्तर उंचावण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत असतात. त्यामुळे बचत गटातील स्थानिक महिलांचा रोजगार जाऊ न देता आहाराचे केंद्रीकरण व खाजगीकरण न करता पूर्वीप्रमाणेच महिला बचत गटांना शालेय पोषण आहाराचे काम देण्यात यावे अशी मागणी आमदार शिंदे यांनी केली होती.
सदर प्रश्नाला अनुसरून उत्तर देताना महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी कोरोना कमी झाल्यानंतर परत पोषण आहाराचे काम बचत गटांना देण्यात येईल असे आश्वासन दिले.