करमाळासोलापूर जिल्हा

सामान्यांच्या अडचणी आधार बनला मनसे ; अनेक कामे मार्गी लागल्याने करमाळ्यात मनसेचीच हवा

करमाळा समाचार

 

करमाळा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर गटातटाचे राजकारण चालते. तर सर्वच गट सध्या मोठे गट असल्याने सामान्य लोकांची अडचण समजून घेण्यासाठी स्वतःचा पक्ष असावा अशी भावना अनेकांच्या मनात आहे. मोठ्यांपुढे गाऱ्हाणे मांडणे जडही जात आहे. त्यामुळे आता सामान्य लोक लहान कामापासुन मोठ्या अडचणीत पर्यंत सध्या सर्वांना मनसे हा जवळचा पक्ष वाटू लागला आहे. व मनसेचे पदाधिकारी तसेच तालुकाध्यक्ष संजय घोलप ते त्यांचे प्रश्न सोडवण्याचा यशस्वी प्रयत्न करत आहेत.

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली व विभागलेले तीन मोठे गट एकत्र आले. त्यामुळे स्थानिक पातळीवर सत्तेविरुद्ध आवाज उठवण्यासाठी पक्ष्यांची संख्या कमी झाली. तर मनसे सध्या कोणत्याच पक्षासोबत नसल्याने स्वतंत्र भूमिका व सामन्यासाठी लढण्याची तयारी दाखवत असल्याने गावपातळीवरचे प्रत्येक अडचणीत मनसे पक्षाच्या माध्यमातून सर्व पदाधिकारी तसेच तालुकाध्यक्ष संजय घोलप हे लक्ष देत प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करीत आहेत.

ग्रामीण भागातील सामान्य शेतकरी असो की शहरातील व्यापारी सध्या प्रश्नाचे उत्तर म्हणुन मनसेचे तालुकाध्यक्ष घोलप यांच्याकडे पाहत आहे. दवाखाना रुग्णांची तातडीने काळजी, महावितरण मध्ये वीज बीलाचा विषय असेल किंवा नवीन कनेक्शन यासह रखडलेली कामे मार्गी लावण्यासाठी, तहसिल विविध प्रकारचे दाखले, परवानग्या अशा प्रकारच्या कामांसाठी लोक सध्या मनसेचा पर्याय उपलब्ध असल्याने आकर्षीत होत आहेत. रोज विविध कामांसाठी घोलप हे सक्रिय काम करताना दिसत आहेत.

मागील काही दिवसात तर विविध कामामुळे मनसेची चमकदार कामगिरी दिसुन येत आहे. हातगाडी चालकांना नगरपरिषद कोऱोनाच्या नावाखाली विरोध करीत असताना सर्व मनसेकडे धाऊन आले यावेळी त्यांची बाजु मनसेने ठाम पणे मांडली, महावितरण ने वीज बीला अभावी वीज तोडणे सुरु केल्यानंतर ते थांबवण्यासाठी लोकांनी मनसे कडे धाव घेतली त्यावेळीही वीज बील जमतील तसे घ्या वीज तोडु करु नका अशी भुमीका मनसेने घेतल्याने दिलासा मिळाला होता.

मायक्रो फायनान्स ची कोरोना काळातही जबरी वसुली सुरु होती त्यालाही विरोध करत तालुका पातळीवर मोठा मोर्चा काढला होता. संगोबा बंधाऱ्याचे दरवाजे खराब झाल्याने गळती सुरु होती. त्यामुळे वीस ते तीस गावांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार होता. संबंधित अधिकारी काही तरी कारणे सांगुन वेळ मारुन नेत होते. त्यामुळे मनसेने अधिकाऱ्यांसमोर आवाज वाढवला व दुसऱ्याच दिवशी काम पुर्ण झाले.

तसेच दहिगाव उपसा सिंचनचे उपचाऱ्यांचे काम पुर्ण करावे यासाठीही मनसेनेच आग्रही मागणी केली. त्यानंतर त्याचीही दखल घेण्यात आली. विविध समित्यावर सर्वपक्षीय लोकांची नियुक्ती करावी अशी मागणी मनसेचे घोलप यांनी केली होती. त्यानंतर एकाच पक्षाचे कार्यकर्ते निवड होत होती त्याला छेद मिळाला व सामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मनसे पदाधिकारीही या समीतीत सहभागी करावे लागले होते.

सामाजीक उपक्रमातही मनसे सहभागी होत बॅंक समोर उन्हात व्यवसायानिमित्त होतकरू महिलेला टेबल, खुर्ची, छत्री भेट दिली, बिबट्याने तालुक्यात थैमान घातले त्यामुळे रात्रीच्यावेळी शेतकरी रात्री भित असे त्यावेळी दिवसाची लाईट शेतकऱ्यांना दिलासा मिळऊन दिला. तसेच बिबट्या हल्लात मरण पावलेले कुटुंबांना आर्थीक मदत मिळावी अशी पालक मंत्र्यांना मागणी केली. ग्रामीण भागातील सिंगल फेज चा प्रश्नही मनसेने सोडवला होता. संजय गांधी निराधार योजनेच्या अनुदान वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे.

याबाबत बोलताना सर्व श्रेय टीम वर्क ला देत आहेत. घोलप यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जि.उपाध्यक्ष राजेंद्र मोरे, ता उपाध्यक्ष, अशोक गोफणे, ता.उपाध्यक्ष मा.राजाभाऊ बागल , शहर अध्यक्ष नानासाहेब मोरे, जि.म.न.वि से संपर्क अध्यक्ष मा. विजय रोकडे, करमाळा ता.संपर्क अध्यक्ष मा.रामभाऊ जगताप, म.न.वि.से.जि.अध्यक्ष मा.सतिश फंड, जि.उपाध्यक्ष म.न.वि.से मा.आनंद मोरे ,शहर अध्यक्ष म.न.वि.से मा.सचिन कणसे, शहर उपाध्यक्ष मा.रोहित फुटाणे, शहर उपाध्यक्ष मा.अजिंक्य कांबळे, जि.म.न.वि.से प्रसिद्धी अध्यक्ष मा.महेश डोके, मा.अनिल माने योगेश काळे, अमोल जांभळे, राजा कुभांर, विजय हजारे, योगेश काळे, स्वप्निल कवडे आदि सहभागी असतात.

मा.राजसाहेब ठाकरे पक्ष प्रमुख यांच्या आदेशानुसार
व दिलीप (बापु )धोत्रे सरचिटणीस मनसे व प्रशांत गिड्डे जि.अध्यक्ष सोलापुर यांच्या मार्गदर्शनाखाली 90% समाजकार्य, 10% राजकारण यानुसार काम करत राहणार असल्याचे तालुकाध्यक्ष संजय घोलप यांनी सांगितले.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE