करमाळा तालुक्यातील पोलिस पाटील महिलेचे कोरोनाने निधन ; पोलिस पाटलांसाठी कोविड सेंटर उभारण्याची मागणी
करमाळा समाचार
पिंपळवाडी ता करमाळा येथील पोलीस पाटील सौ सुवर्णा मदन पाटील वय 55 यांचे कोरोना आजाराने निधन झाले असून गेली पंधरा दिवसांपासून त्यांचेवर बार्शी येथे उपचार सुरू होते. त्यांच्या निधनामुळे पिंपळवाडी गावावर शोककळा पसरली आहे. तसेच प्रत्येक गावातील पोलीस पाटील, तहसीलदार समीर माने सो, पोलीस निरीक्षक कोकणे सो यांनी हळहळ व्यक्त करत श्रद्धांजली दिली आहे,त्यांचे मागे पती एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

करमाळा तालुक्यातील सर्व पोलीस पाटील यांना तातडीने लसीकरण करून घेणं आवश्यक आहे, गाव पातळीवर शासकीय काम करत असताना, अनेक लोकांशी संपर्क येऊन यापूर्वी देखील अनेक पोलीस पाटील कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. पंढरपूर या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यातील पोलीस प्रशासनातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या उपचारासाठी कोविड केअर हॉस्पिटल सुरू केले आहे. त्या ठिकाणी पोलीस पाटील यांना देखील उपचार भेटावेत अथवा तशा पद्धतीने पोलीस पाटील यांच्यासाठी देखील सोलापूर जिल्ह्यात कोविड केअर सेंटर उभारण्यात यावे.
– संदिप शिंदे पाटील,ता.अध्यक्ष पोलीस पाटील संघ, करमाळा.
