करमाळासोलापूर जिल्हा

वीजेचा धक्का बसुन मयत झालेला कर्मचारी नितीन पाटील न्यायाच्या प्रतिक्षेत ; गावकरी व कुटुंबीयांचा मृत शरीर ताब्यात घेण्यास नकार

करमाळा समाचार 

होतकरू आणि मनमिळावू अशा स्वभावाचा नितीन पाटील आज महावितरणच्या कामानिमित्त कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करत असताना विजेचा झटका बसून मृत्यू झाला. परमिट घेतलेले असताना ही अचानक वीज येऊन त्याचा मृत्यू झाला असे गावकरी व कुटुंबीयांचे म्हणणे आहे. त्या विरोधात जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही. तोपर्यंत त्याचं मृत शरिर ताब्यात घेणार नसल्याची भूमिका आता गावकरी व कुटुंबियांनी घेतली आहे. तरीही तब्बल आठ ते नऊ तास उलटले तरी अद्यापही कोणावरही गुन्हा दाखल न झाल्याने गावकरी संतप्त झाले आहेत.

सुरुवातीला नितीन पाटील यांचा कर्जत करमाळा रोडवर रावगाव हद्दीत जाधव यांच्या घराशेजारील रोहित्रा वर काम करत असताना सकाळी साडेदहाच्या सुमारास मृत्यू झाला होता. त्यानंतर तब्बल दोन तासांनी महावितरणचे कर्मचारी येऊन त्या ठिकाणाहून त्याच्या मृत शरीर खाली उतरवलं दोन तासापर्यंत एकही कर्मचारी तिकडे फिरकले नसल्याने गावकऱ्यांमध्ये संतप्त वातावरण तयार झालं होतं. त्यानंतर पोलिसांनी व काही नेते मंडळींनी मध्यस्थी करून वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला व मृत शरीर खाली उतरून शवविच्छेदनासाठी नेण्यात आले.

तर आता भरपाईसाठी गावकऱ्यांनी मागणी केलेली असताना फोन वरून चर्चेतून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सहकार्याची भूमिका दाखवलेली आहे. परंतु नितीन पाटील यांच्या मृत्यू जवाबदार व्यक्तीला शासन झाले पाहिजे. परमिट घेतलेल्या असताना वीज आलीच कशी या कारणावरून संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला पाहिजे व प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. या कारणासाठी सकाळपासून सर्व ग्रामस्थ पोलीस ठाणे बाहेर बसलेले असताना अद्यापही त्यांची दखल घेतली गेली नसल्याने सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

तर जोपर्यंत गुन्हा दाखल केला जात नाही तोपर्यंत आम्ही मृत शरीर ताब्यात घेणार नसल्याची भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे. अजूनही मयत शरीर ताब्यात घेतले नाही. त्यामुळे मृत्यूनंतरही नितीन पाटील याला न्यायासाठी का झगडावे लागतेय असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE