दत्तकला शिक्षण संस्थेत “मिशन युवा स्वास्थ्य” उपक्रमाअंतर्गत कोरोना लसीकरण शिबीर संपन्न
करमाळा प्रतिनिधी
दत्तकला शिक्षण संस्थेत मिशन युवा स्वास्थ्य उपक्रमाअंतर्गत कोरोना लसीकरण शिबीराचे आयोजन तंञशिक्षण संचालनालय, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे, सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन तसेच दत्तकला शिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात आले होते,

या लसीकरणाचा लाभ दत्तकला शिक्षण संस्थेच्या सर्व विभागांमधील विद्यार्थ्यांना तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाला झाला सदर लसीकरणाचे उद्घाटन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.रामदास झोळ यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी संस्थेच्या सर्व विभागांचे प्राचार्य व विभागप्रमुख तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

सदर कोरोना लसीकरण यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी दत्तकला शिक्षण संस्थेच्या कर्मचारी वर्गाने व सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.