E-Paperकरमाळासोलापूर जिल्हा

जनतेचे दिशाभूल व फसवणुक केल्याप्रकरणी ठाकरे सरकारच्या मंत्र्यावर गुन्हा दाखल करा – मनसे

करमाळा समाचार 

महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यासह ऊर्जासचिव व कार्यकारी संचालक महावितरण यांच्याविरोधात संगनमत करून मानसिक क्लेश, आर्थिक लुबाडणूक, फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करणेबाबत मनसेच्या वतीने मागणी करण्यात आली आहे. तालुकाध्यक्ष संजय घोलप यांच्यावतीने याबाबतचे निवेदन वरिष्ठ पोलीस निरीक्षक करमाळा पोलीस ठाणे यांच्याकडे देण्यात आले.

कोरोना महामारी मुळे देशभरात आणि विशेषतः महाराष्ट्रात दिनांक २२ मार्च २०२० ते ८ जुन २०२० दरम्यान ना वीज मीटर तपासणी केली गेली, ना देयके देण्यात आली. घरातच बंद झालेल्या जनतेला या कालावधीत वीज वापरासाठी महावितरण कंपनी कडून आचानक वापरापेक्षा तिप्पट-चौपट असण्याची अवाजवी व भरमसाठ वीज बिले पाठवली.

दरम्यानच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रारी मांडल्यानंतर ऊर्जामंत्री तसेच अधिकाऱ्यांसोबत अनेकदा बैठका झाल्या. या बैठका नंतर वीजबिलात कपात करण्याचा निर्णय लवकरच सरकार घेईल आणि नागरिकांना दिलासा देईल असे आश्वासन ऊर्जामंत्री यांनी दिलं.

या निवेदनावर घोलप यांच्यासह जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र मोरे, शहराध्यक्ष नानासाहेब मोरे, सचिन कणसे, रोहित फुटाणे, अमोल भोसले, अजिंक्य कांबळे, अनिल माने, आकाश लष्कर, योगेश झोळ, अक्षय झोळ आदिंच्या सह्या आहेत. जि.उपाध्यक्ष राजेंद्र मोरे,ता उपाध्यक्ष, अशोक गोफणे, मनसे नेते अनिल माने,शहर अध्यक्ष नानासाहेब मोरे, जि.म.न.वि से संपर्क विजय रोकडे, जि.अध्यक्ष म.न.वि.से.सतिश फंड,जि.उपाध्यक्ष म.न.वि.से आनंद मोरे शहर अध्यक्ष म.न.वि.से सचिन कणसे,शहर उपअध्यक्ष रोहित फुटाणे, विजय हजारे ,अजिंक्य कांबळे,योगेश काळे,स्वप्निल कवडे पदाधिकारी उपस्थित होते.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE