करमाळाक्राईमसोलापूर जिल्हासोलापूर शहर

वाशिंबे ग्रामपंचायत मध्ये अपहार ; तत्कालीन सरपंच व ग्रामसेवकावर गुन्हा दाखल

करमाळा समाचार

तालुक्यातील वाशिंबे ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी तत्कालीन सरपंच मनीषा झोळ व ग्रामसेवक आर जे गाडेकर यांनी संगणमत करून आर्थिक गैरव्यवहार करून अकरा लाख पंधरा हजार 356 रुपयांचा अपहार करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची तक्रार विस्तार अधिकारी अविनाश थोरात यांनी दिले आहे.

याप्रकरणी 2024 मध्ये प्रताप झोळ यांनी सन 2017 ते 2022 चे दरम्यान वाशिंबे ग्रामपंचायत मध्ये माजी सरपंच मनीषा झोळ व तत्कालीन ग्रामसेवक गाडेकर यांनी ग्रामपंचायतीच्या कामकाजात केलेल्या भ्रष्टाचार व अनियमितताबाबत चौकशी करून संबंधितावर कारवाई करणे बाबत अर्ज दिला होता. त्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्याकडील आदेश प्राप्त झाल्यानंतर चौकशी करून अहवाल सादर करण्यात आला.

politics

यामध्ये जानेवारी 2020 ते सप्टेंबर 2022 मधील आक्षेप घेण्यात आलेल्या हायमास्ट खरेदी मध्ये आढळून आलेल्या चार लाख 68 हजार 151 रुपयांची वसुली पात्र आहे, आरोग्य विषयक खरेदीत 99 हजार 500 वसूलपात्र आहे, तसेच 12 डिसेंबर 2022 ची आरोग्यविषयक रेड रॅक वगैरे फर्निचर खरेदी 99 हजार , ग्रामपंचायत कार्यालयासाठी फर्निचर खरेदी 49 हजार 952, प्राथमिक शाळेसाठी फर्निचर कपाट खरेदी 49 हजार 974 हजार, 5जानेवारी 2023 ची मेडीक्लोर खरेदी रक्कम 49 हजार 980, आरो फिल्टर खरेदीची रक्कम दोन लाख 97 हजार 800 असे एकूण 11 लाख 15 हजार 356 रुपये वसूल पात्र असून त्यास श्री गाडेकर व झोळ हे 50 टक्के जबाबदार असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

 

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE