करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

पगार असताना पैसे खायचा मोह आवरला नाही ; रंगेहाथ पकडले गुन्हा दाखल

करमाळा समाचार

पावर टिलरच्या अनुदानासाठी लागणारे कागदपत्र ऑनलाइन अपलोड न करता शेतकऱ्याकडे पैशाची मागणी केली. यावेळी दहा हजार रुपये लाच स्वीकारताना संबंधित लोकसेवक (कर्मचाऱ्यास) लाजलुचपत प्रतिबंधक विभागाकडून पकडण्यात आले आहे. सदरची कारवाई दि १५ रोजी केम येथे दुपारी २ वाजता करण्यात आली. याप्रकरणी भारत मारुती शेंडे, (वय ५४) कृषी पर्यवेक्षक तालुका कृषी अधिकारी कार्यालय करमाळा यांच्यावर कारवाई करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांनी त्यांच्या शेतीच्या कामासाठी त्यांच्या पत्नीचे नावे महाराष्ट्र शासनाच्या महाडीबीटी या पोर्टलवर पावर टिलर खरेदीसाठी शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानासाठी ३० मे २३ रोजी ऑनलाईन अर्ज केला होता. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने सोडत होऊन तक्रारदार यांना पावर टिलर खरेदी करण्यासाठी पूर्वसंमती मिळाली होती. त्यानुसार तक्रारदार यांनी पावर टिलर खरेदी करून त्याबाबतची सर्व कागदपत्रे ऑनलाइन अपलोड केले.

त्यानंतर शेंडे यांनी पडताळणी करून तक्रारदार यांच्याकडून कागदपत्रे घेतली. परंतु शेंडे यांनी पडताळणी रिपोर्ट सबमिट न केल्याने तक्रारदार यांच्या पत्नीच्या खात्यावर अनुदान जमा झाले नव्हते. त्यामुळे तक्रारदार यांनी शेंडे यांना संपर्क केला असता त्यांनी तक्रारदार यांच्या पडताळणी रिपोर्ट सबमिट करण्यासाठी दहा हजार रुपये द्यावे लागतील असे सांगून लाचेची मागणी केली. त्यानंतर तक्रारदार यांनी सोलापूर येथील लाचलुजपत विभागाकडे तक्रार केली. त्यावरून पाळत ठेवून शेंडे यांना दहा हजार रुपये घेताना रंगेहात पकडण्यात आले.

सदरची कारवाई लाच लचपत विभागाचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत कोळी, पोलिस हवालदार प्रमोद पकाले, पोलीस कॉन्स्टेबल गजानन किनगी, राहुल गायकवाड यांच्या पथकाने केली आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE