रस्ते दुरुस्तीच्या नावाखाली करोडो रुपयाचा भ्रष्टाचार ; ठेकेदार व अधिकाऱ्यांची मिली भगत ?
करमाळा समाचार
करमाळा तालुक्यात रस्ते दुरुस्तीच्या नावाखाली गावोगावी कामे सुरू असून कामे संबंधित ठेकेदार व अधिकारी भागीदारीत कामे करत आहेत. यातून करोडो रुपयांचा भ्रष्टाचार होत असून रस्त्याची दुरुस्ती मात्र कागदपत्रे दाखवली जात आहे. यामुळे गेली तीन वर्षात रस्ते दुरुस्तीच्या नावाखाली खर्च केलेला निधी व संबंधित कामाची पाहणी बाळासाहेबांचे शिवसेना कडुन संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांचा भांडाफोड करणार असल्याची माहिती बाळासाहेबांच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी दिली आहे.

आज बाळासाहेबांच्या शिवसेनेचे पदाधिकारी तालुकाप्रमुख देवानंद बागल, शहर प्रमुख संजय शीलवंत, युवा सेना प्रमुख निखिल चांदगुडे, उपशहर प्रमुख नागेश गुरव, राजेंद्र काळे, तालुकाप्रमुख राहुल कानगुडे, गायकवाड, हिवरवाडी शाखाप्रमुख आजिनाथ इरकर, कोळगाव शाखाप्रमुख नागेश शेंडगे, रंभापुरा शाखाप्रमुख निलेश चव्हाण आदी पदाधिकाऱ्यांनी करमाळा रायगाव रस्ता दुरुस्तीची कामे कामाची पाहणी केली.

त्यावेळी संपूर्णतः कामे बोगस असल्याची दिसून आले. करमाळा तालुक्यातील रस्ता दुरुस्तीचे कामासाठी दरवर्षी कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च केला जातो मात्र हा निधी वाटून खाण्यासाठी एक टोळी बांधकाम खात्यात कार्यरत आहे. केवळ कागदोपत्री रस्ते दुरुस्ती दाखवून उचलल्या जातात.
तेरी भी चूप मेरी भी चुप असा सर्व मामला असल्यामुळे सत्य बाहेर येत नाही. करमाळा रायगाव रस्ता दुरुस्तीची पाहणी केली असता डांबराचा खडीचा अवशेष आढळून आला नाही. शिवाय साईड पट्टीच्या कडेची सर्व झाडे काढण्याचे टेंडर असताना कुठेही झाडे न काढता केवळ एक जेसीबीने तास दोन तास काम करून कामाचा देखावा केला जात आहे. यामुळे गेली तीन वर्षात झालेल्या ते दुरुस्तीच्या कामाचे ऑडिट करण्याची मागणी बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांनी रस्ते दुरुस्तीचे कामाला विशेष लक्ष दिले आहे. रस्ता दुरुस्त नसल्यामुळे अनेकांचा अपघात होऊन गमवावे लागतात मात्र निधी येऊन सुद्धा काम होत नसल्यामुळे नाराजी होत आहे. याची दखल लोकप्रतिनिधींनी सुद्धा घेणे गरजेचे आहे.
श्री उबाळे साहेब
अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग करमाळा. रस्ते दुरुस्तीच्या कामासंदर्भात तक्रारअसल्या तर त्याचे निवारण केली जाईल. इस्टिमेट अंदाजपत्रक प्रमाणे काम केली नसल्यास त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल.