करमाळासोलापूर जिल्हा

आंदोलन चिघळले ; वीज वितरण कंपनीने शेतीपंपाची लाईट सोडेपर्यंत आम्ही इथून उठणार नाही

करमाळा समाचार – संजय साखरे 

करमाळा तालुक्यातील पारेवाडी येथील वीज कार्यालयासमोर आंदोलन करून तेथील शेतकऱ्यांना संबोधित केल्यानंतर अतुल खूपसे यांच्या नेतृत्वाखाली करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील शेकडो शेतकरी मोटर सायकल वर येऊन करमाळा तहसील कार्यालय या ठिकाणी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

त्यानंतर शेतकऱ्यांनी आपला मोर्चा करमाळा येथील वीज वितरण कंपनीच्या मुख्य कार्यालयाकडे वळविला असून या कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी आपले हे आंदोलन सुरू केले आहे. याच दरम्यान पोलिस अधिकाऱ्यांनी या आंदोलनाच्या ठिकाणी भेट देऊन शेतकऱ्यांना शांत करत सोशल डिस्टंसिंग पाळण्याचे आवाहन केले.

याच दरम्यान उपअभियंता जाधव साहेब यांनी आंदोलनाच्या ठिकाणी येऊन शेतकऱ्यांची भेट घेतली व शेतकऱ्यांना वीज बिल भरण्याचे आवाहन केले. दरम्यान वीज वितरण कंपनीचे अधिकारी आणि शेतकऱ्यांचे नेते अतुल खूपसे पाटील व पोलीस अधिकारी यांच्यामध्ये आता चर्चा चालू असून यामध्ये तोडगा निघण्याची शेतकऱ्यांना आशा आहे. वीज वितरण कंपनीने शेतीपंपाची लाईट सोडेपर्यंत आम्ही इथून उठणार नसल्याचा पवित्रा या ठिकाणी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी घेतला आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE