करमाळासोलापूर जिल्हा

उत्तरेश्वर ज्युनिअर कॉलेजमध्ये आजीबाईची गाणी कार्यक्रम संपन्न

केम प्रतिनिधी

श्री उत्तरेश्वर ज्युनियर कॉलेज केम याठिकाणी आजीबाईची गाणी व बहिणाबाई चौधरी यांच्या काव्याचा जागर हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून केम येथील मा. सरपंच सौ.कल्याणीताई अजितदादा तळेकर , डॉ सुजाताताई कमलेश जांभळे या उपस्थित होत्या. या विशेष कार्यक्रमास या ज्युनियर कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या आजी श्रीमती नादानबी करीम पठाण, श्रीमती विमल तानाजी माळी, श्रीमती मालन रामलिंग कावळे, श्रीमती उषा पांडुरंग राऊत, श्रीमती छाया लक्ष्मण गव्हाणे, श्रीमती वत्सला ज्ञानदेव शिंदे , सौ. नवल मधुकर तळेकर, सौ.तारामती नागनाथ काशविद या आजीबाई पहिल्यांदाच आवर्जून उपस्थित होत्या.

या विशेष कार्यक्रमाची सुरुवात परमपूज्य डॉ.बापूजी साळुंखे व संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. यावेळी केम गावच्या मा.सरपंच सौ. कल्याणीताई अजितदादा तळेकर यांनी या कॉलेजमधील आजीबाईची गाणी या विशेष उपक्रमाचे कौतुक केले. विद्यार्थ्यांनी त्यांच्या भावी जीवनात सुयश मिळवावे असे त्यांनी सांगितले. यावेळी डॉ. सुजाता जांभळे यांनी बहिणाबाई चौधरी यांच्या कार्यकर्तुत्वावर प्रकाश टाकला. ग्रामीण भागातील स्त्रीयामध्ये जग जिंकण्याची ताकद असल्याचे त्यांनी सांगितले. कुटुंबातील आजी ही प्रत्येक घराचा आधारस्तंभ असल्याचे सांगितले.

यावेळी ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थिनी कु अश्विनी तळेकर, कु. तनुजा तळेकर, कु पूजा वायभासे, कु. शिवानी काशवीद या विद्यार्थिनींनी बहिणाबाईची गाणी म्हटली. यावेळी उपस्थित आजीबाईंनी विद्यार्थ्यासोबत संवाद साधत काव्याचा जागर करीत आपल्या नातू – नातीचे कॉलेज जीवन बघून आनंद व्यक्त केला. यावेळी या संस्कृती केंद्राची विद्यार्थिनी कु. संस्कृती सतीश तळेकर या विद्यार्थिनीचा एमबीबीएस साठी प्रवेश झाल्यामुळे तिचा देखील या ठिकाणी सत्कार करण्यात आला. यावेळी शालेय समिती अध्यक्ष श्री दयानंद तळेकर यांनी ग्रामीण भागात असणारे आजीचे व आजीची गाणी यांचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य श्री.एस.बी. कदम यांनी या विशेष कार्यक्रमाचे कौतुक केले व विद्यार्थ्यांना बहिणाबाई चौधरी यांच्या काव्याचे महत्त्व सांगितले.

या कार्यक्रमासाठी प्रा.डॉ.मच्छिंद्र नागरे , प्रा.संतोष साळुंखे, प्रा.संतोष रणदिवे, प्रा.सतीश बनसोडे, प्रा.अमोल तळेकर, प्रा.पराग कुलकर्णी , श्रीमती वृषाली पवार यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन श्री उत्तरेश्वर ज्युनियर कॉलेजमधील विद्यार्थी- विद्यार्थिनी यांनी केले. करमाळा तालुक्यात नव्हे सोलापूर जिल्ह्यात प्रथमच राबवलेल्या या अनोख्या नव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE