उद्या सकाळी 13 टेबल व सात फेऱ्यांच्या माध्यमातून मतमोजणी ; रामवाडीसह चार गावांपासून सुरुवात
करमाळा समाचार (विशाल घोलप)
करमाळा तालुक्यात रविवारी मतदान झाले आहे. तर सोमवारी सकाळी 9 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. यासाठी तहसील परिसरात नियोजन करण्यात आले आहे. एकूण सात फेऱ्यांच्या माध्यमातून सदरची मतमोजणी होणार आहे सर्व फेऱ्यांमध्ये 13 टेबल च्या माध्यमातून ही मतमोजणी पूर्ण केली जाणार आहे. तर केवळ ओळखपत्र असलेल्या व्यक्तीना प्रवेश दिला जाणार आहे. अशा सक्त सुचना नियंत्रक तथा तहसिलदार विजयकुमार जाधव यांनी दिल्या आहेत.

15 ग्रामपंचायतीच्या या निवडणुकीमध्ये कावळवाडी येथे 92.12, रामवाडी 90.53, भगतवाडी 92.61, जेऊर 70.63, चिखलठाण 78.2, राजुरी 87.53, केतुर 68.97, गौडरे 88.07, कंदर 80.84, केम 74.51, कोर्टी 81.60, वीट 84.72, निंभोरे 83. 28, घोटी 81.67 रावगाव 81. 58 अशा पद्धतीने एकुण 79. 70 टक्के म्हणजेच 39 हजार 808 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

सुरुवातीला पहिल्या क्रमांकाच्या फेरीत
रामवाडी, कावळवाडी, भगतवाडी व गौंडरे
दुसऱ्या फेरीत
केतुर, वीट
तिसऱ्या फेरीत
कोर्टी, रावगाव
चौथ्या फेरीत
चिखलठाण, घोटी
पाचव्या फेरीत
कंदर, निंभोरे
सहाव्या फेरीत
केम
सातव्या फेरीत
जेऊर, राजुरी