दिग्गजांच्या गावातील गडाला खिंडार ; काही ठिकाणी सत्तांतर तर काही ठिकाणी पुन्हा जुन्यांना संधी
करमाळा समाचार

तालुक्यात बागल गटाने पुन्हा एकदा ग्रामीण भागातली आपली ताकद दाखवत अनेक ठिकाणी मुसंडी मारली आहे. तर सभापती गहिनीनाथ ननवरे व संतोष वारे सारख्या दिग्गजांना स्वतःच्या गावातच पराभूत व्हावे लागले आहे. मागील काळात केलेली कामांचा फायदा बोरगाव येथील विनय ननवरे यांना झालेल्या दिसला आहे. तर मांगीत शिंदे गटाने मुसंडी मारत आपली ताकद दाखवली आहे.

तालुक्यातील लक्ष लागून राहिलेल्या मुख्य ग्रामपंचायतीमध्ये दिग्गजांना मोठे झटके असल्याचे दिसून आले आहे. जातेगाव येथील ग्रामपंचायतीमध्ये संतोष वारे यांचे वर्चस्व होते. पण त्या ठिकाणी सर्व पक्ष व गावकरी एकत्र आल्याने वारे यांना सपशेल पराभव मान्य करावा लागला आहे. संपूर्ण नऊ जागा या विरोधी गटाला गेल्याने वारे यांची गावातीलच पराभवाने पिछेहाट झाल्याचे दिसून येत आहे.
तालुक्याच्या पंचायत समितीचे वर्चस्व असलेले सभापती गहिनीनाथ ननवरे यांच्याच पॅनल चा स्वतःच्या गावातच धुरळा झालेला दिसून आला. आशिश गायकवाड गटाने सात जागी विजय मिळवत एकतर्फी विजय संपादन केल्याने एकच ननवरे यांचा पराभव झाला आहे. मागील पाच वर्षातील सत्ता व विकास कामे ग्रामस्थांना रुचलेले दिसत नाहीत. शिवाय बागल गटाला उभारी देणारा हा विजय मानला जाता आहे.

बोरगाव येथे विनय ननवरे यांच्या मागील पाच वर्षाच्या कामाच्या जोरावर पुन्हा एकदा तिथे आ. संजय शिंदे – जगताप गटाचे ननवरे पॅनलला ग्रामस्थांनी पसंती देत विजयी केले आहे. तर मागील पाच वर्षांमध्ये संजय शिंदे यांच्या माध्यमातून ननवरे यांनी गावाचा कायापालट केला होता. याचे फळ पुन्हा एकदा नवर्यांना दिसून येत आहे.
हिवरवाडी येथे बागल गटाला विजय मिळाला असला तरी त्या ठिकाणी त्यांचे प्रमुख दावेदार बाळासाहेब पवार यांच्या पत्नीच्या पराभव झाल्याने मोठा धक्का मानला जात आहे. पण सत्ता मात्र बागल गटाला टिकवता आली आहे. तसेच त्या गावात जयवंतराव जगताप यांचे निकटवर्तीय जयराज चिवटे यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे.
मांगी गावात आज पर्यंत एकतर्फी बागल गटाला सत्ता मिळत होती. मांगी हे बागल यांचे मुळगाव तरी या गावात शिंदे गटाच्या सुजित बागल यांनी कडवी झुंज देत जवळपास शंभर मतांच्या फरकाने स्वतःचा विजय तर मिळालाच शिवाय गावात चार उमेदवार निवडून आल्याने एक तुल्यबळ काट्याची लढत दिली आहे. परंतु त्या गावात तरीही बागल गटाने आपले सत्ता कायम ठेवले आहे.
तर शेलगाव क येथे सर्व पक्ष एकत्र तरुण मुलांचा एका गटाने त्यांना लढत देत कडवी झुंज दिली. पण अपयशी ठरली याठिकाणी हा तिच्यासाठी जागांवर सर्वपक्षीय गटांचा विजय झाला तर नवख्या व तरुण पोरांनी दिलेल्या कडव्या झुंजला अपयश आले.