सोलापूर जिल्ह्यातील पाच तालुक्यात अखेर १३ पासुन संचारबंदी लागु ; इतर तालुक्यात चार पर्यत असेल मुभा
करमाळा समाचार
कोरोना रुग्ण वाढीच्या पार्श्वभूमीवर संचार बंदीची घोषणा नुकतीच जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केली आहे. पाच तालुके वगळता इतर तालुक्यांमध्ये पहिल्याप्रमाणे निर्बंध चार वाजेपर्यंत राहतील. तर करमाळा सह इतर पाच तालुक्यात अत्यावश्यक सेवा वगळता संचारबंदी लागू होणार आहे. उद्या पासुन सर्वत्र कडक निर्बंध आहेत त्यात चार पर्यत मुभा तर 13 आँगस्टपासून संबंधित 5 तालुक्यात संचारबंदी लागु असेल.


करमाळा, माढा, माळशिरस, सांगोला, पंढरपूर या पाच तालुक्यांमध्ये संचार बंदी लागू केल्यानंतर अत्यावश्यक सेवा मध्ये सवलती दिल्या जाणार आहेत. दूध, भाजीपाला, किराणा, दुकाने, हॉस्पिटल, पेट्रोल पंप यांना वगळण्यात आले आहे. रविवारी रात्री संबंधित आदेश काढले आहेत.