करमाळासोलापूर जिल्हा

या कारणामुळे दिव्यांगाच्या अडचणीत भर ; एका कामासाठी हेलपाटे

सोलापूर – प्रतिनिधी 

अस्थी व्यंग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी दिव्यांग रुग्णांना मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागत असल्याचे चित्र सध्या सोलापूर जिल्हा रुग्णालयात पाहायला मिळत आहे. त्या ठिकाणचे ऑनलाईन सर्वर ठप्प झाल्याने सकाळी नऊ वाजल्यापासून रांगेत असलेल्या दिव्यांगाना सव्वा अकरा वाजले तरी अद्यापही रांगेच आहे. तर यानंतर फक्त अर्धा तासच हे कार्यालय सुरू राहणार असल्याने पुन्हा एकदा येण्याची गरज या गरीब दिव्यांगांना पडू शकते. त्यामुळे ऑनलाईन झालेल्या सुविधांचा फायदा कमी आणि तोटा जास्त होतोय असे दिसून येत आहे.

जिल्ह्यात मोजक्याच ठिकाणी ऑनलाईन प्रमाणपत्र काढण्याची सुविधा उपलब्ध असल्याने सदर ठिकाणी जाण्यासाठी अंतर अधिक आहे. तसेच तारखा वर तारखा पडल्यामुळे दिव्यांगांना नेहमीच हेलपाटे मारावे लागत असतात. त्यातही रोज सुरु असलेले कार्यालय सकाळी 10 ते 12 या कालावधीत सुरू असते. तर गुरुवारी ऑनलाईन सर्व्हर ठप्प झाल्यामुळे कामकाज पूर्ण बंद आहे. त्यामुळे पहाटे उठून घाईगडबडीत पैसे खर्च करून पोहोचलेल्या दिव्यांगाना आज तरी आपले प्रमाणपत्राची नियमाप्रमाणे नोंदणी करता येईल का पुन्हा एकदा हेलपाटे मारावे लागतील असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे दिव्यांगांसाठी प्रत्येक तालुक्यात प्रमाणपत्र मिळण्याची सुविधा उपलब्ध झाली पाहिजे अशी दिव्यांगाकडुन व्यक्त केले जात आहे.

करमाळा तालुका हा सोलापूर जिल्ह्याच्या एका टोकाला असल्यामुळे जवळपास 130 किलोमीटरचे अंतर पार करून दिव्यांगाना सोलापूर येथील जिल्हा रुग्णालयात जावे लागत आहे. त्या ठिकाणी कोणत्या अधिकारी असतील नसतील त्या दिवशी विनाकारण हेलपाटा होऊन दुसऱ्या दिवशी गेल्यानंतर वेळ संपली असती. त्यानंतर तिसऱ्या हेलफाट्याला संबंधित अधिकारी नसतील किंवा सर्वर डाऊन असेल याचा फटका बसल्यामुळे त्यादिवशी एका कामासाठी जवळपास तीन ते चार हेलपाटे व येण्याजाण्याचा खर्च तर होतोच शिवाय वेळही जाते. पण त्या दिव्यांगां काम झालेले नसते. त्यामुळे आधीच आपल्या व्यंगामुळे अडचणीत सापडलेल्या दिव्यांगाला अधिक अडचणीत भर पडते तर करमाळा सारख्या ठिकाणी यांचे प्रमाणपत्र मिळावे अशी सोय उपलब्ध करावी अशी मागणी मनसेचे तालुकाध्यक्ष संजय बापु घोलप यांनी केली आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE