सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान ; केस केल्यास ॲट्रोसिटीची धमकी – गुन्हा दाखल
करमाळा समाचार
सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करुन तक्रार केली तर ॲट्रोसिटी दाखल करेल अशी धमकी सोगावच्या कैलास पाखरे यांनी दिल्याप्रकरणी त्यांच्यावर करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

दिनांक 15/04/2021 रोजी दुपारी 03:00 वा चे सु मौजे सोगाव पश्चिम गावातील शरद तुळशीदास गोडगे याने फेान करुन सांगितले की, गावातील कैलास हनुमंत पाखरे याने ग्रामपंचायत मालकिचे ग्रामपंचायत कार्यालय समोर असलेले पिण्याचे पाण्याचे आरो प्लन्टवर दगड मारुन तोडफोड केली आहे.

त्यानंतर ग्रामसेवक लागलीच मौजे सोगाव पश्चिम येथे जावुन पाहिले असता आरो प्लन्टचे पाण्याचे कर्इनबक्सचे, इतर साहित्यचे तोडफोड करुन सरकारी मालमत्तेचे 30,000 रु चे नुकसान केले आहे.
तेव्हा ग्रामसेवकाने करमाळा पोलीस ठाणेस तक्रार देण्यासाठी स्वप्निल सोमनाथ गोडगे यांचे सोबत जात असताना कैलास हनुमंत पाखरे याने त्यांचे फोन करुन तुम्ही तक्रार करु नका नाही तर मी तुमचे विरुध्द व गावातील माहिती देणारे लोकांविरुध्द खोटी अट्रासिटीची केस करतो अशी धमकी देवुन शिवीगाळी, दमदाटी केली आहे. अशी फिर्याद गावचे ग्रामसेवक नेमचंद भुजबळ यांनी दिली आहे.