करमाळाक्राईमसोलापूर जिल्हा

पाण्यात बुडुन लहान भावंडांचा मृत्यु ; करमाळा तालुक्यातील घडलेली दुर्घटना

करमाळा समाचार ( karmalasamachar)

हिंगोली (hingoli) जिल्ह्यातील ऊसतोड मजूर हे करमाळा तालुक्यात ऊस तोडणी साठी आले होते. त्यांचे काम पांगरी तालुका करमाळा येथे सुरू असताना लहान मुले ही काही अंतरावर असलेल्या गायरानात खेळत होते. त्या ठिकाणी पाण्याचे मोठे खड्डे होते. त्या डबक्यात त्या दोघांचे मृतदेह आढळून आले आहेत. उशिरापर्यंत मुले का येत नाहीत म्हणून याचा शोध घेतला त्यावेळी सदर घटना उघडकीस आली.

प्रतीक्षा श्रावण चव्हाण व पृथ्वीराज श्रावण चव्हाण असे नयत मुलांची नावे आहेत. त्यांचे कुटुंब तालुका शेगाव येथून करण्यात आले होते. सदरची घटना रविवारी दुपारी उघडकिस आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मयत प्रतीक्षा व पृथ्वीराज हे आपल्या कुटुंबासमवेत करमाळ्यातील पांगरी येथे आले होते. सकाळी कुटुंबीय ऊस तोडणी व्यस्त असताना दोन्ही मुले सदर ठिकाणाहून काही अंतरावर असलेल्या गायरान जमिनीकडे गेली. त्या ठिकाणी एक पाण्याचा मोठा खड्डा होता. त्यात पाणी असल्याने परिसरात ते खेळत असताना दोघांनाही अंदाज आला नसावा. त्या डबक्यात दोघं पडले. त्यानंतर बराच काळ शोधाशोध केल्यानंतर दोघांचा मृतदेह त्या पाण्यात आढळून आला.

पांगरी येथील गायरान जमिनितील पाण्याच्या खड्यामध्ये पडल्याने त्यांना उपचाराकरिता उपजिल्हा रुग्णालय करमाळा येथे दाखल केले. तेथील मा डॉ. बंडगर, वैदयकीय अधिकारी कॉटेज हॉस्पीटल करमाळा ता करमाळा जि.सोलापुर यांनी सदरचे दोन्ही मयत याना तपासुन उपचारापुर्वीच मयत झाले असल्याचे सांगितले.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE