करमाळासोलापूर जिल्हा

जुगार अड्ड्यावर छापा ; वीट, झरे, अंजनडोह येथील १० जणांवर कारवाई

करमाळा समाचार 

बातमीदारमार्फत बातमी मिळाली की,मौजे वीट रोड चे उजव्याबाजुला हॉटेल साईलीला चे बाजुला कॅनलचे कडेला असणा-या फॉरेस्ट चे सरकारी तालीचे जवळ असलेल्या लिंबाच्या झाडाखाली काही इसम 52 पत्याचा डाव खेळत असल्याचे खात्रीशीर बातमी मिळाली होती.

सदर बातमीतील ठिकाणचे थोडे आलिकडे वाहन उभा करून सदर ठिकाणी पोलिस पायी चालत गेले. तेथे काही इसम वर्तुळाकार बसुन 52 पत्याच्या डावावर जुगार खेळत असल्याचे दिसले. लागलीच सदर ठिकाणी पोलिसांनी त्यांना घेराव घालुन जागीच पकडले सदरचा छापा २८ ऑगस्टला दुपारी साडे चार वाजता टाकण्यात आला आहे.

१) विकास जनार्धन कांबळे वय 40 वर्षे रा. विट ता. करमाळा 2) र्इश्वर इदराम शिंदे वय 48 वर्षे रा. खांबेवाडी ता. करमाळा 3) विकास अभिमान काळे वय 32 वर्षे रा. अंजनडोह ता. करमाळा 4) परमेश्वर अर्जुन आवटे वय 30 वर्षे रा. वीट ता. करमाळा 5) अरूण माणिक चांदणे वय 50 वर्षे रा. वीट ता. करमाळा 6) तुकाराम शिवाजी जाधव वय 35 वर्षे रा. वीट ता. करमाळा 7) तुळशीराम भिकाजी जाधववय 55 वर्षे रा. वीट ता. करमाळा 8) दत्तु शंकर कांबळे वय 54 वर्षे रा. झरे ता. करमाळा 9) रमेश उत्तम जाधव वय 43 वर्षे रा. वीट ता. करमाळा 10) विठ्ठल भगवान गणगे वय 60 वर्षे रा. वीट ता. करमाळा असे असल्याचे सांगीतले .सदर इसमासमोर खालील वर्णनाचे जुगाराचे साहीत्य व रोख रक्कम मिळुन आले त्याचे वर्णन खालील प्रमाणे 9200 /- रूपयासह 104205/- जुगाराचे साहीत्य व रोख रक्कम मोटारसायकल मिळुन आले आहेत.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE