बंद मधुन सामान्य नागरीक बाहेर पडतोय बंद लादणे धोकादायक ; करमाळ्याचे पत्रकार विशाल घोलप यांचे फेसबुक लाईव्ह
करमाळा समाचार – सुनिल भोसले

बंद मुळे आधीच अनेकांची जीवनात विस्कळीतपणा आलेला असून अनेकजण अडचणीत सापडले आहेत. शासनाने अनलॉक 4 जाहीर केला आहे. आता कुठेतरी सामान्य नागरिक बाहेर पडून उद्योग व्यवसायाला लागलेला असून पुन्हा एकदा बंद त्यांच्यावर लादण्यास सामान्य नागरिक अडचणीतून बाहेर निघण्याची नावच घेणार नाही. त्यामुळे बंद पाळताना विचार करावा. तर शासनाने व प्रशासनाने जाहीर केलेले बंदच पाळावे खाजगी बंदला व्यापाऱ्यांनी पाठिंबा देऊ नये अशी विनंती करमाळ्याचे पत्रकार विशाल घोलप यांनी करताना नागरिकांना फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून आवाहनही केले आहे.
