करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

निधनवार्ता – प्रदिपकुमार जाधव पाटील यांचे निधन

करमाळा समाचार

करमाळा तालुक्यातील सुप्रसिद्ध डॉक्टर प्रदिपकुमार जाधव पाटील (आबा) यांचे आज सायंकाळी ६.४५ वाजता नगर येथे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. त्यांची अंत्ययात्रा उद्या सकाळी ११.०० वाजता त्यांच्या गावी तरटगाव येथुन निघणार आहे.
त्यांचं पार्थिव अंत्य दर्शनसाठी उद्या सकाळी ६.०० ते ९.०० अर्बन बँकेच्या पाठीमागे पाटील हॉस्पिटल येथे ठेवण्यात येणार आहे.

तालुक्यात सर्वात जुने व प्रसिद्ध असलेले डॉक्टर जाधव पाटील यांच्या निधनाने तालुक्यात शोककाळा पसरली आहे. तालुक्यासह परिसरातील इतर तालुक्यातूनही रुग्ण त्यांच्याकडे आवर्जून येत असत. सर्पदंशावर रामबाण उपाय त्यांच्याकडे असल्यामुळे बरेचसे रुग्ण शेजारच्या जिल्ह्यातुनही त्यांच्याकडे उपचार घेण्यासाठी करमाळ्याकडे धाव घेत होते. अशा सर्व रुग्णांना देवासमान वाटणारे जाधव पाटील यांचे निधन सर्वाना धक्का देणारे ठरले आहे.

तरडगाव व पंचक्रोशीत राजकीय वलय असणारे तालुक्यात प्रमुख नेत्यांपैकी एक असलेले डॉक्टर जाधव पाटील यांच्यावर उद्या तरडगाव येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यानी अदिनाथ कारखान्याचे अध्यक्षपदही भुषवले होते. त्यांच्या जाण्याने वैद्यकीय सह राजकीयक्षेत्रात न भरुन निघणारे नुकसान झाले आहे.

ads
ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE