करमाळासोलापूर जिल्हा

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ; उद्या पासुन या गावचा आठवडा बाजार सुरु

करमाळा – संजय साखरे 

करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील सुमारे पाच हजार लोकवस्ती असलेल्या सावडी गावचा आठवडी बाजार उद्यापासून पुन्हा सुरू होणार असल्याची माहिती सावडी चे सरपंच श्री भाऊसाहेब शेळके यांनी दिली आहे.

सुमारे पाच हजार लोकवस्तीचे सावडी हे गाव कोर्टी ते कोंढार चिंचोली या रस्त्यावर वसलेले आहे. करमाळा वरून पुण्याला जाणारी सर्व वाहने येथून जातात. येथील लोकांना आठवडी बाजारासाठी पारेवाडी, भिगवन, राशीन, जिंती या ठिकाणी जावे लागत होते. याच मुळे सप्टेंबर 2018 मध्ये येथे आठवडी बाजार सुरू करण्यात आला होता. परंतु मध्यंतरी कोरोणामुळे हा बाजार बंद झाला होता.

*हॉटेल धनश्री जवळ हा प्रकार घडला आहे संपूर्ण ट्रक भर रस्त्यात पेटला*

परंतु सध्या ग्रामीण भागातील जवळजवळ साठ टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण झाले असल्यामुळे कोरोना चा प्रादुर्भाव बऱ्यापैकी कमी झालेला आहे. म्हणून लोकांची होणारी ओढाताण थांबवण्यासाठी सावडीतला आठवडी बाजार उद्या रविवार दिनांक 3 ऑक्टोबर पासून पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. तरी या आठवडी बाजारासाठी सावडी आणि पंचक्रोशीतील लोकांनी कोरोना चे नियम पाळून सहकार्य करावे असे आवाहन सावडीचे सरपंच प्रतिनिधी भाऊसाहेब शेळके यांनी केले आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE