करमाळाक्राईमसोलापूर जिल्हासोलापूर शहर

विद्युत कनेक्शन साठी पैशाची मागणी ; सहाय्यक अभियंत्यावर गुन्हा दाखल – लाचलुचपत विभागाची कारवाई

करमाळा समाचार

तक्रारदार यांच्या आईचे नावे असलेली शेत जमिनीमध्ये शेतीपंपाचे विद्युत कनेक्शन करता महावितरण कार्यालय जेऊर यांचे कडून विद्युत पोलची उभारणी करून विद्युत कनेक्शन देण्याकरिता दिग्विजय जाधव यांनी तक्रारदाराकडून दहा हजार रुपये लाचीची मागणी केली व लाच रक्कम स्वीकारण्यासाठी संमती दिल्यावरून त्यांच्यावर कार्यवाही करण्यात आली आहे.

दिग्विजय आबासाहेब जाधव, सहाय्यक अभियंता वर्ग २ शाखा कार्यालय जेऊर, तालुका करमाळा जिल्हा सोलापूर असे कारवाई झालेल्या अधिकाऱ्यांच्या नाव आहे. यांनी संबंधित कामासाठी दहा हजार रुपये लाचेची मागणी केली होती. त्यांना जेऊर येथील रहात्या घरातुन ताब्यात घेण्यात आले.

पोलिस अंमलदार शिरीष कुमार सोनवणे यांच्या पथकाने केली आहे. सदरच्या पथकातील अतुल घाडगे, सलीम मुल्ला, स्वामीराव जाधव, राहुल गायकवाड यांनी सदरची कार्यवाही यशस्वीरित्या पार पाडली.

ads
ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE