कृषी कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी वंचितचे एक दिवसीय धरणे आंदोलन
प्रतिनिधी सुनिल भोसले
केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधात तयार केलेले कायदे रद्द करण्यात यावेत या मागणीसाठी दिल्ली येथे बसलेल्या शेतकऱ्यांना अॅड बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार करमाळा येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दिनांक 5 मार्च रोजी माढा लोकसभा जिल्हा सचिव रामेश्वर सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या मागणीचे निवेदन तहसीलदार समीरजी माने यांना देण्यात आले.

पुढे निवेदनात म्हटले आहे की, केंद्र सरकारने केलेला कृषी कायदा शेतकरी विरोधी असल्याने केंद्र सरकारने त्वरित केलेले कायदे रद्द करावेत असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. यावेळी निवेदन देताना माढा लोकसभा जिल्हा सचिव रामेश्वर सुर्यवंशी, वचिंतचे युवक तालुकाध्यक्ष साहेबराव वाघमारे, माजी शहराध्यक्ष विशाल लोंढे, माजी जिल्हा सचिव देविदास भोसले, माजी तालुकाध्यक्ष सुभाष ओव्होळ, माजी तालुकाध्यक्ष प्रविण ओव्होळ, वंचितचे अमोल सुरवसे इत्यादी.