गरुड झेप – 50 टक्के दिव्यांग असतानाही करमाळ्याच्या मुलाची उत्तुंग भरारी
करमाळा समाचार
जिद्द, चिकाटी, संयम आणि यश जिद्द आनी मेहनतीने एक दिव्यांग मुलगा असीम यश प्राप्त करू शकतो याच उदाहरण म्हणजे आपल्या करमाळा येथील सुपुत्र प्रसाद दत्तात्रय चेंडगे.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे त्यांची पीएच.डी साठी नुकतीच निवड झाली आहे.

महाराष्ट्रातून फक्त 8 जागांपैकी प्रथम क्रमांकाने त्यांची पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास या विभागा मध्ये निवड झाली आहे. प्रसाद चेंडगे यांचे शिक्षण महाराष्ट्रतील सातारा, सोलापूर, पुणे, रत्नागिरी या जिल्हयांमधुन झाले आहे.

वडिल दत्तात्रय बाळू चेंडगे सध्या पोस्टामधे जेऊर येथे पोस्टमास्टर या पदावर काम करत आहेत, तर आई सौ.उमादेवी दत्तात्रय चेंडगे या गृहिणी आहेत. संघर्षाचा वारसा, चिकाटी, आई-वडिलांचे शिक्षणाचे संस्कार यामुळे दिव्यांग व्यक्ती सुध्दा काय करू शकतो याच एक उदहरणच या चेंडगे दामंपत्यानी आपल्यासमोर ठेवले आहेत. 50% दिव्यांग असताना, शारिरिक मर्यादा असताना सुध्दा प्रसाद चेंडगे त्यांनी हे अभूतपुर्व यश संपादन केले आहे. त्यानी पदवीचे शिक्षण कृषी महाविद्यालय, पुणे येथुन तर पदव्युतर शिक्षण दापोली विद्यापीठा मधून प्रथम क्रमांकाने पूर्ण केले आहे.
घरुन असणाऱ्या संपूर्ण कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे प्रसाद यानी हे यश मिळवले अस ते सांगतात.
आई उमादेवी यांनी त्याला कायम प्रोत्साहन देवुन त्याच्या दिव्यांगपणाची जाणीव कधीच भासू दिली नाही तर वडीलांनी त्यांच्या मधील क्षमता ओळखून त्याला मार्गदर्शन केले. मोठा भाऊ तुषार आणि वहिनी यांनी देखील लहान भावाला विशेष मार्गदर्शन केले.
मागील वर्षी काही पॉइंट्स ने त्यांना हे यश मिळाले नाही. पण अपयशाने खचून न जाता त्यांनी पुन्हा एकदा चिकाटीने प्रयत्न करून हे यश मिळवलेच.
मनमिळाऊ स्वभाव व कायम मदतीची भावना यामुळे मित्रामधील प्रसाद यांचा वावर खुप मोठा आहे. हे यश मिळाल्या मुळे मित्रांनी देखील पेढे वाटून आनंद व्यक्त केला. आजच्या या स्पर्धेच्या युगामधे मुलांची नोकरी मिळवण्यासाठी होणारी धडपड आपण पाहतोय, पण अशा दिव्यांग मुलाने सुध्दा मागे न राहता केवळ जिद्दीच्या जोरावर मी सुध्दा करू शकतो हे दाखवून दिले आहे.
त्यांच्या या यशा मुळे इतर दिव्यांग विद्यार्थ्यांना देखिल एक नवीन प्रेरणा मिळाली आहे.
त्यांच्या या पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा..
त्यांचे हे यश पाहुन एवढेच म्हणावेसे वाटते
रख हौसला वो मंजर भी आयेगा,
प्यासे के पास चल के समन्दर भी आयेगा,
थक कर न बैठ ऐ मंजिल के मुसाफिर,
मंजिल भी मिलेगी…
और मिलने का मज़ा भी आयेगा।
Despite being 50 percent disabled, Karmala’s son excelled #prasad_chendage #kolgaon #karmala #solapur #post_office #jeur