BREAKING NEWS – करमाळ्याला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटली ; उद्या पाणी

करमाळा समाचार

करमाळा नगर परिषदेचे पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन जेऊर परिसरात फुटल्याने उद्या पाणी येणार नसल्याची माहिती मिळत आहे. सध्या करमाळा नगर परिषदेचे कर्मचारी संबंधित ठिकाणी पोहोचले असून काम वेगात सुरू आहे.

आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास जेऊर चिखलठाण रस्ता येथे दहिगाव येथून करमाळा पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्याची माहिती सोशल माध्यमातून मिळाली होती. सुरुवातीला नगरपरिषदेकडून तितकासा गांभीर्याने घेतले नाही. नंतर मात्र पाण्याचा फ्लो वाढल्याने नगरपरिषद यंत्रणा खडबडून जागी झाली व संबंधित ठिकाणी जाऊन पाहणी केली.

त्या ठिकाणी पाईपलाईन ही लिकेज असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्या ठिकाणी प्रगतीपथावर काम सुरू झाल्याची दिसून आले. त्यामुळे आज व उद्या काम सुरू राहणार असून उद्या करमाळा शहराला होणारा पाणीपुरवठा होणार नसल्याची माहिती नगरपरिषदेकडून देण्यात आली आहे.

WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE
DMCA.com Protection Status