मांगी गावात भारत डाळचे वाटप ; ४५६ कुटुंबांनी घेतला लाभ
करमाळा समाचार
भारत सरकारच्या ग्राहक व्यवहार विभाग आणि नाफेड 60 रुपये किलो दराने नागरिकांना दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर भारत डाळ या नावाने चणाडाळ विक्री चा शुभारंभ मांगी गावा मध्ये करण्यात आला यावेळी गावातील 456 लोकांनी याचा लाभ घेतला.

या कार्यक्रमाचे शुभारंभ करतेवेळी मांगी गावातील वाल्मीक कांबळे, उमेश बागल, पोपट क्षीरसागर, नंदकुमार नरसाळे, पांडुरंग शिंदे, सुधाकर नरसाळे, अनिल नलवडे, लालासाहेब जाधव, संतोष नरसाळे, राजेंद्र बागल मारुती कांबळे, सुधीर कांबळे, प्रकाश सोनवणे, हरिभाऊ क्षीरसागर, पोपट गळघाटे, विजय कांबळे, चतुराबाई शिंदे, सोमनाथ जाधव इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी बोलताना सुजित बागल म्हणाले, सरकारच्या योजना आ. संजय मामा शिंदे यांच्या माध्यमातून गावोगावी तळागाळामध्ये गावकऱ्यांना लाभ मिळवून देणार व समाजामध्ये जनजागृती निर्माण करणार आहे.