ग्रामपंचायतीच्या वतीने दिव्यांगांना धनादेश वाटप
केम – संजय जाधव
तालुक्यातील सर्वात मोठया समजल्या जाणाऱ्या केम ग्रामपंचायतीच्या वतीने अपंग , मतिमंद गरजू लाभार्थाना १४ व्या वित्त आयोगातून ३० लोकाना प्रत्येकी सात हजार रूपयाचा धनादेश वाटप करण्यात आले. एकूण दोन लाख दहा हजार रूपये वाटप केले शासनाचे आदेशाने प्रत्येक ग्रामपंचायतीने अंपगासाठि तीन टक्के निधी हा खर्च करावा लागतो. त्या नुसार हा खर्च केला.

या प्रसंगी ग्रामविकास अधिकारी नवनाथ सातव यानी अपंगाच्या शासनाच्या योजनाची माहिती सांगितली. यावेळी संरपच आकाश भोसले, उपसरपंच नागनाथ तलेकर, माजी सरपंच अजित दादा तलेकर, राहुल कोरे, नामदेव तलेकर, माजी पंचायत समिती सदस्य विष्णू पारखे, विनोद पाटिल, दिपक तलेकर, कुरडे सर, दादा अवघडे, तानाजी केंगार, मुनीराज पोलके, मिलींद नरखेडकर व सर्व अंपग बंधु उपस्थित होते.
