करमाळाक्राईमसोलापूर जिल्हा

करमाळ्यातुन रेशनचा गहु, तांदुळ काळ्याबाजारात नेताना वीटच्या तीघांना अटक ; कर्जत पोलिसांची कारवाई

करमाळा समाचार – 

शासकीय रेशनचे धान्य स्वताचे आर्थिक फायदयाकरीता काळा बाजार करुन खुल्या बाजारात विक्री करण्यासाठी घेऊन जात असताना दोन पिकअप सह वीट तालुका करमाळा येथील मालक श्रीकांत प्रकाश ढेरे (वय २५), गाडीचा चालक बाळासाहेब दादासाहेब ढेरे (वय ३८) रा. वीट, गाडीचा चालक रेवन्नाथ मुरीधर ढेरे (वय ३९) रा. वीट ता करमाळा जि सोलापुर असे तीघे गाडीसोबत मिळुन आले आहेत.

तिघांना मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले आहे. सदरची कारवाई कर्जत जिल्हा अहमदनगर च्या पोलिसांच्या वतीने दि ४ दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. यावेळी त्यांच्याकडुन तब्बल १० लाख ४४ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

राशीनचे तलाठी प्रशांत गौडचर यांना माहीती मिळाल्यावर चिलवडी ता. कर्जतहुन दोन पिकअप रेशन धान्य घेऊन येत असल्याची माहीती पोलिसांना दिली. त्यावेळी पोलिसाकडुन सापळा रचण्यात आला. दुपारी दोन च्या सुमारास राशीन ते चिलवडी जाण्याऱ्या रस्त्यावर सागर हॉटेल शेजारी दोन पिकअप थांबवण्यात आल्या.

पिकअप क्रमांक ( एम एच १२ एस एफ ९४७३) व पिकअप क्रमांक (एम एच १६ ए वाय ३८५८) यामध्ये ५५ किलो वजनाच्या ४० गोण्या रक्कम २२ हजार रुपये, ५५ किलो वजनाच्या ३२ गोण्या रेशनचा तांदुळ रक्कम १७ हजार ६००, ५५ किलो वजनाच्या ८ गोण्यातुन रेशनचा गहु रक्कम ४ हजार ४०० मिळुन आला आहे. दहा लाख रुपये किंमतीच्या दोन पिकअप असे एकुण १० लाख ४४ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE