समाज कल्याण विभागाअर्तंगत चर्मकार बांधवांना गटई स्टॉलचे वाटप
प्रतिनिधी सुनिल भोसले
समाजकल्याण विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत गंरजु चर्मकार बांधवांना गटई स्टाॅलचे वाटप शेतकरी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथआण्णा कांबळे व नायब तहसीलदार शांताराम किरवे यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह येथे वाटप करण्यात आले.

यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृहाचे करमाळा अधिक्षक सुभाष भोसले, फेरीवाले संघटनेचे अध्यक्ष संजय घोरपडे, संतोष कांबळे उपस्थित होते. तसेच लाभार्थी गोरख दगडु कांबळे, नागेश नंदकुमार कांबळे, प्रमोद सुधाकर कांबळे, दत्तात्रय ज्ञानोबा कांबळे व पात्र लाभार्थी यांना गटाई स्टॉलचे वाटप करण्यात आले. शेवटी बोलताना दशरथआण्णा कांबळे म्हणाले, स्टाॅल वाटप केले तसेच यांना व्यवसाय करण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी असे कांबळे म्हणाले.
