ताज्या घडामोडीपंढरपूरसोलापूर जिल्हा

पंढरपुरात सलग तीन फेरीत लीड घेत भालकेंना मागे टाकत समाधान आवताडे पुढे

करमाळा समाचार – पंढरपूर निकाल 

पंढरपुरात आता भगीरथ भालके यांची आघाडी मोडीस काढत समाधान आवताडे यांनी आगेकूच केली आहे. त्यामध्ये नवव्या फेरीअखेर आतापर्यंत 2228 मतांची आघाडी घेऊन समाधान आवताडे पुढे आहेत. तर भगीरथ भालके सहाव्या फेरीपर्यंत आघाडीवर होते. पण सातवी, आठवी, नववी फेरीत पिछाडीवर पडताना दिसत आहे.

सहाव्या फेरीअखेर भगीरथ भालके हे 194 मतांनी लीड वर होते. तर सातव्या पिढीनंतर 1027 मतांची आघाडी सातव्या फेरीत घेऊन 833 मतांनी समाधान आवताडे हे पुढे गेले. त्यानंतर आघाडी कायम ठेवत समाधान आवताडे यांनी आठव्या फेरीत 1333 मतांची आघाडी घेत दोन हजाराचा पल्ला पार केला यामध्ये 2166 मतांनी आघाडीवर आहे होते. त्यानंतर नवव्या फेरीची मतमोजणी पूर्ण झाली त्यावेळी 62 मतांचा लीड समाधान यांना मिळाला. त्यामुळे आता त्यांची आघाडी 2228 मतांची झालेली आहे.

आतापर्यंत नऊ फेऱ्या पूर्ण झाल्या असून 52 हजार 469 मतांची मोजणी झालेली आहे. नव्या फेरीअखेर समाधान आवताडे यांना 26 हजार 255 तर भगीरथ भालके यांना 24 हजार सत्तावीस मते मिळाली आहेत. नवव्या फेरीत 2755 अवताडे यांना तर 2793 भगीरथ भालके यांना मते मिळाली आहेत. नवव्या फेरीत 62 मतांची आघाडी अवताडे यांच्या बाजूने होती.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE