श्रीराम प्रतिष्ठान तर्फे श्रमिक बांधकाम कामगारांना गृह उपयोगी साहित्याचे वाटप
करमाळा समाचार – संजय साखरे
करमाळा तालुक्यातील सामाजिक क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या श्रीराम प्रतिष्ठान या सामाजिक सेवाभावी संस्थे मार्फत आज करमाळा तालुक्यातील श्रमिक बांधकाम कामगारांना गृह उपयोगी साहित्याचे वाटप सोलापूर येथील आई सेवाभावी प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहनजी डांगरे व करमाळा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

करमाळा तालुक्यातील श्रीराम प्रतिष्ठान ही सामाजिक सेवाभावी संस्था ही गेले अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहे.भाजपाचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे अध्यक्ष असलेल्या या प्रतिष्ठानच्या माध्यमातून करमाळा तालुक्यातील गरजू लोकांना मोठ्या प्रमाणावर मदत करण्यात येत आहे.याशिवाय या प्रतिष्ठानच्या माध्यमातून सर्व धर्म विवाह सोहळा आयोजित केला जात तरी. यामार्फत अनेक गोरगरीब जोडप्यांचे विवाह लावले जात असून त्यांना संसारिक साहित्य ,मंगळसूत्र भेट दिले जात आहे.

आज या संस्थेच्या माध्यमातून करमाळा तालुक्यातील श्रमिक बांधकाम कामगारांना गृह उपयोगी भांडी वाटप कार्यक्रम करण्यात आला. यावेळी पंचवीस बांधकाम कामगारांना भांडी सेट वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना गणेश चिवटे म्हणाले की, बांधकाम कामगार हा समाजातील सर्वात दुर्लक्षित घटक असून यांना अनेक हाल व संकटाना सामोरे जावे लागते. 2014 ला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून समाजातील तळागाळातल्या लोकांना आपण मोठ्या प्रमाणावर मदत करीत असून याचा आजपर्यंत करमाळा तालुक्यातील गोरगरीब परिवारांना मोठ्या प्रमाणावर आपण याचा फायदा मिळून दिला आहे.
यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष मोहनजी डांगरे, पोलीस निरीक्षक विनोद घुगे, सोलापूर जिल्हा भाजपाचे सरचिटणीस श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री गणेश भाऊजी चिवटे, करमा तालुका भाजपचे अध्यक्ष राम भाऊ धाणे,जगदीश अगरवाल, काकासाहेब पवार,अफसर जाधव,अमोल पवार,अमोल दुरदे , नितिन् झिंजाडे , विनोद महानावर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्री नितीन झिंजाडे यांनी केले तर सूत्रसंचालन सचिन नवले यांनी केले तर आभार अमोल पवार यांनी मानले.