करमाळ्यात आज दिव्यांगांसाठी साहित्य वाटप ; खा. सुप्रिया सुळे, रुपालीताई यांच्या हस्ते उद्घाटन
करमाळा समाचार
खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांगांसाठी मोफत व्हीलचेअर सायकल, स्टिक्स, इतर साहित्य वाटप करण्याचा कार्यक्रम आज दुपारी दोन वाजता आमदार संजय मामा शिंदे यांच्या संपर्क कार्यालय येथे होणार आहे. कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस पूजा झोळे यांनी केले आहे

सदरच्या कार्यक्रमासाठी खासदार सुप्रिया सुळे व रुपालीताई चाकणकर या झुमवर उपस्थित असणार आहे. शिवाय तालुक्याचे आमदार संजय मामा शिंदे, राष्ट्रवादी युवती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सलक्षणा ताई सलगर यांच्या शुभहस्ते उद्घाटन होईल.

तर डॉ. विशाल अहिरे उपविभागीय पोलिस अधिकारी , तहसीलदार समीर माने, गट विकास अधिकारी श्रिकांत खरात , मुख्याधिकारी वीणाताई पवार , पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे, तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी संतोष वारे आदी उपस्थित राहणार आहे