Uncategorized

सोलापूर जिल्हा परीषद समाजकल्याण विभागाकडून वीट, ता.करमाळा येथे जलशुद्धीकरण यंत्राचे उद्घाटन

उमरड (प्रतिनिधी)

दिनांक 17/06/2021 रोजी सोलापूर जिल्हा परिषद समाज कल्याण विभागातर्फे दलित वस्ती निधी अंतर्गत मौजे विट येथे जिल्हा परिषद सदस्या लक्ष्मी आवटे यांच्या प्रयत्नातून वीट येथे बसवलेल्या जलशुद्धीकरण यंत्र (आरो) चे उद्घाटन करमाळ्याचे कार्यतत्पर सभापती माननीय गहिनीनाथ ननवरे यांच्या हस्ते झाले.

यावेळी मा.सभापती शेखर गाडे, बिभीषण आवटे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आनंदकुमार ढेरे,विट ग्रा.पं उपसरपंच समाधान कांबळे सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब पाटील , सुभाष जाधव,संजय तनपुरे,संजय फडतरे,मनोज ढेरे मा.उपसरपंच संजय ढेरे,डॉ.भागवत ढेरे,जोतीराव राऊत,श्रीकांत जाधव,किसन ढेरे,मा.उपसरपंच सचिन गणगे,संजय कांबळे,नवनाथ जाधव,अंकुश जगदाळे,युवा नेते भाऊ गाडे,मचिंद्र जाधव,युवा नेते मनोज ढेरे,अनिल दाततोडे,विलास कांबळे,अंकुश कांबळे,रायचंद दाततोडे,भैरवनाथ दाटतोडे,युवा नेते ग्रा.पं.सदस्य राजू गाडे,विशाल गाडे,सुनील ढेरे ही मंडळी उपस्थित होती.

यावेळी सभापती यांनी सर्व ग्रामस्थांना अहवान करत सध्याच्या कोरोनाच्या काळात आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे असे सांगितले.त्याचबरोबर आपल्या आरोग्यासाठी पाणी ही तितकेच महत्वाचे आहे.

मा.सभापती श्री शेखर (तात्या) गाडे यांनी विट हे गाव तालुक्यातील मोठे गाव असून या कोरोना रोगाच्या काळात जनतेने योग्य नियोजन करून घेतलेल्या काळजी बद्दल गावकऱ्यांचे आभार मानले. त्यावेळी आलेल्या प्रमुख मान्यवरांचा युवा नेते बिभीषण (नाना) आवटे यांनी आदर सत्कार केला व सुभाष जाधव यांनी सूत्रसंचालन केले.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE