करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

गायकवाडांवरील हल्ल्याचा अजितदादा गटाच्या जिल्हाध्यक्षाकडुन संताप ; कृत्य करणारे मनुवादी म्हणत ताशेरे

करमाळा समाचार

प्रविण गायकवाड यांच्यावर झालेल्या शाईफेकीचा निषेध करीत मनुवादी विचाराने ग्रासलेल्या व शिवाजी महाराजांच्या नावाने घुसखोरी केलेल्या लोकांचे कृत्य असून ही शाईफेक महाराष्ट्राच्या पुरोगामीत्वावर झालेली शाईफेक असल्याचे मत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी व्यक्त केले. ते करमाळा येथे राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीच्या निमित्ताने आले होते. यावेळी ते पत्रकारांशी संवाद साधला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सर्वत्र आढावा बैठका घेण्याचे काम सुरू आहे. यानिमित्ताने या महिन्यात उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या दोघांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अकरा तालुक्यात रोजगार मिळावे घेण्यासाठी कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन यासाठी आढावा बैठकीत तयारीच्या सूचना देण्यासाठी सदर बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाध्यक्ष उमेश पाटील हे करमाळा येथे उपस्थित त्यांना मार्गदर्शन करीत होते. यावेळी महिला जिल्हाध्यक्ष वर्षा शिंदे, तालुकाध्यक्ष शितल क्षीरसागर, तालुकाध्यक्ष भारत आवताडे, मानसिंग खंडागळे, शिवराज जगताप आदिसह कार्यकर्ते उपस्थीत होते.

politics

पुढे बोलताना पाटील म्हणाले की, हिंदू-मुस्लिम असो किंवा जातीजातीतील दरी कमी करण्याचे काम प्रविण गायकवाड हे संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून व मराठा सेवा संघाच्या माध्यमातून पुरुषोत्तम खेडेकर यांनी केलेले आहे. दोघांनीही जातीजातीतील संघर्ष कमी करून जागृती निर्माण करण्याचे काम केलं आहे. अशा लोकांना महाराष्ट्र भूषण देण्यात यावा अशा योग्यतेची असून त्यांच्यावर शाईफेक होणे हे निषेधार्ह आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सर्व महापुरुषांच्या विचारावर चालणारा पक्ष असून या घटनेचा निषेध करतो असंही यावेळी पाटील यांनी सांगितले.

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE