करमाळाक्रिडाताज्या घडामोडीसकारात्मकसोलापूर जिल्हासोलापूर शहर

जिल्हास्तरीय थ्रो बॉल स्पर्धेत श्री राजेश्वर विद्यालयाला दुहेरी मुकुट

करमाळा समाचार – संजय साखरे


दि.१२/०८/२०२४ रोजी क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत व जिल्हा क्रीडा अधिकारी सोलापूर आयोजत शालेय थ्रो बॉल क्रीडा स्पर्धा सिंहगड पब्लिक स्कूल केगाव सोलापूर येथे पडल्या.

सदर स्पर्धेमध्ये सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांनी सहभाग नोंदवला. करमाळा तालुक्याचे प्रतिनिधित्व करत अंतिम सामन्यात राजुरीच्या १४ वर्ष वयोगटातील संघाने अक्कलकोट संघास पराभव करत अंतिम सामना जिंकला. याबरोबर प्रशालेच्या १७ वर्षे वयोगटातील मुलांनी पंढरपूर संघास पराभूत करून प्रथम क्रमांक पटकावला. या दोन्ही संघाची विभागीय स्तरावर निवड झाली आहे.

थ्रो बॉल संघातील खेळाडूंना श्री.मारुती संदिपान साखरे, राष्ट्रीय खेळाडू विठ्ठल सरोदे (सोलापूर) व संतोष पाटील (अक्कलकोट) यांचे मार्गदर्शन लाभले. विजयी खेळाडूंचे वैजनाथ स्वामी सेवा मंडळाचे संस्थापक सचिव श्री. लालासाहेब गोविंद जगताप, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. अनिल सोपान झोळ, जिल्हा क्रीडा अधिकरी मा. गणेश पवार, जिल्हा थ्रो बॉल अशोसियनचे सचिव मा. संतोष खेंडे व प्रशालेच्या शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी व राजुरी ग्रामस्थ यांनी कौतुक केले.

politics
DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE