करमाळाताज्या घडामोडीसोलापूर जिल्हा

करमाळ्याचा पाणी प्रश्न पेटला ; पाणी न सोडल्यास रास्तारोकोचा इशारा

प्रतिनिधी- सुनिल भोसले

कुकडी प्रकल्पतील अतिरिक्त पाणी व उजनी धरणातील अतिरिक्त पाणी करमाळा तालुक्यातील लाभ क्षेत्रातील आसणाऱ्या गावातील तलावात सोडण्याची मागणी शेतकरी कामगार संघर्ष समितीने जिल्हाधिकारी यांना ई-मेल द्वारे व करमाळा तहसिलदार समीर माने यांना निवेदन देण्यात आले. यावेळी दशरथआण्णा कांबळे बोलताना म्हणाले, पावसाळा सुरू होऊन तीन महिने झाले असुन करमाळा तालुक्याला समाधान कारक पाऊस झाला नाही. तसेच कोरोनाच्या संकटात सापडल्याने व लाॅकडाऊन मध्ये तालुक्यातील छोटे मोठे व्यवसाय ठप्प झाल्याने शेतकरी शेतमजूर सर्वसामान्य गोरगरीब जनता उपासमारीने हैराण झाली आहे. तालुक्यातील शेतकरी वर्ग पावसावर अवलंबून असणारा त्रस्त झाला आहे. कुकडी व उजनी धरणाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना कुकडी धरणातील व उजनी धरणातील अतिरिक्त पाणी सोडावे सध्या कुकडी धरण 95% भरले तर उजनी 82%भरले असल्याने लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनच्या आश्या पल्लवीत झाल्या आहेत. शेजारी‌ असलेल्या कर्जत तालुक्यातील गावांना धरणाच्या डाव्या कालव्याव्दारे पाणी सोडण्यात येते. मग करमाळा तालुका शिवेवर असताना सतत अन्याय होत असुन तसेच पुढे निवेदनात म्हटले आहे.

सदर कुकडीचे अतिरिक्त पाणी मांगी तलावात सोडल्यास 27 गावांना दिलासा मिळणार आहे. त्याच बरोबर उजनी धरणातील पाणी सोडल्यास दहिगांव उपसा सिंचन योजनेवर करमाळा तालुक्यातील 24 गावे अवलंबून आहेत. म्हणून शासनाने गांभीर्याने विचार करून 1 सष्टेबरच्या आत पाणी सोडावे अन्यथा शेतकरी कामगार संघर्ष समितीच्या वतीने ‌करमाळा बायपास देवीचा माळ येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल अशा इशारा शेतकरी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथआण्णा कांबळे यांनी दिला‌ आहे.

यावेळी सरपंच दादासाहेब जाधव, सरपंच चांगदेव इवरे , सरपंच हरिचंद्र झिंझाडे , सरपंच गणेश अंधारे, विठ्ठल शिंदे माजी संचालक आदिनाथ ,किसन झिंजाडे सामाजिक कार्यकर्ते अनिल तेली आण्णा सुपनर सुनिल खारे चर्तुभुज इरकर नवनाथ झिंजाडे, धनंजय झिजाडे,शहाजी झिंजाडे,आप्पा भोसले,आप्पा झिजाडे, शांतीलाल झिंजाडे ,लक्ष्मीकात झिंजाडे ,ज्ञानदेव कांबळे, शहाजी ठोसर सुभाष शिंदे बापुराव पवार भागवत वाघमोडे, भिमराव भोसले तसेच. पोथरे निलज मांगी पांडे धायखिडी‌ खांबेवाडी,म्हसेवाडी इत्यादी‌ गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE