पवार जनरल हाॅस्पिटलच्यावतीने सिटी स्कॅन सुविधेचे डॉ.रविकिरण पवार यांचे कार्य कौतुकास्पद- डॉ.-किशोर गोडगे
करमाळा समाचार
करमाळा तालुक्यात पवार जनरल हाॅस्पिटलच्या माध्यमातून तालुक्यात प्रथमच कोरोना रुग्णांकरीता स्पेशल वार्डची सोय करून वैद्यकीय सेवा देण्याचे काम डॉ. रविकिरण पवार यांनी केले असून तालुक्यातील रुग्णांना सिटीस्कॅनसाठी बाहेर गावी जावे लागत होते ती गैरसोय दूर करण्यासाठी ग्लोबल रेडिओ डायग्नाॅस्टिक्स करमाळा सिटी स्कॅन सेंटर सुरू करण्यात आले असून करमाळा तालुक्यातील नागरिकांना पवार जनरल हाॅस्पिटलच्या माध्यमातून सि.टी.स्कॅनची सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम डाॅ. रविकिरण पवार यांनी केले असून त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे असे मत बार्शीचे सुप्रसिद्ध डॉ. मेंदू नेरो सर्जन किशोर गोडगे यांनी व्यक्त केले.

कोरोना महामारीमुळे मानवी जीवनावर मोठे संकट निर्माण झाले होते अशा परिस्थितीत आपल्या जीवाची बाजी लावून डॉक्टर रविकिरण पवार यांनी पवार जनरल हाॅस्पिटलच्या माध्यमातून नागरिकांना तत्पर सेवा देऊन अनेकांचे प्राण वाचविण्याचे काम केले आहे त्यांचा आदर्श घेऊन डॉक्टरानी वैद्यकीय सेवा देण्याचे काम करावे ग्लोबल रेडिओ डायग्नाॅस्टिक्स करमाळा सिटी स्कॅन सेंटरच्या वतीने शुभारंभानिम्मित एकदिवसीय मेंदुचा सिटी स्कॅन दोन हजार रुपयात या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी ते बोलत होते.

शिबिरात नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून या शिबिरामध्ये नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन आपला सिटी स्कॅन करून तपासणी केली. या कार्यक्रमास डॉ.चंद्रकात वीर डॉ. राजेश शहा, अध्यक्ष डॉ.श्रीराम परदेशी, उपाध्यक्ष चंद्रकांत सारंगकर , डॉ. विशाल शेटे ,डॉ. प्रमोद कांबळे, डॉ.कविता कांबळे, डॉ.अविनाश घोलप डॉ.अर्चना पाटील, डॉ. प्रतिक निंबाळकर, डॉ भोसले डॉ दयानंद शिंदे, डॉ, अनुप खोसे ,डॉ. हर्षवर्धन माळवदकर , डॉ प्रशांत कंरजकर,डॉ.उमेश जाधव, डॉ केमकर, डॉ.प्रमोद शिंदे, डॉ.अमोल घाडगे, डॉ, विनोद गादीया, डॉ.महेश वीर, डॉ.बालाजी कटके, डॉ.बिपीन परदेशी , डॉ.राहुल जाधव डॉ गणेश राऊत , डॉ.अशोक शिंदे, करमाळा तालुका मेडिकोज गिल्डचे सर्व डॉक्टर तसेच केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे सर्व सदस्य उपस्थित होते. सर्वांनी केलेल्या सहकार्याबद्दल उपस्थित सर्वांचे डॉ.रविकिरण पवार ,योगिता पवार अजिंक्य पवार यांनी पवार जनरल हाॅस्पिटलच्या वतीने आभार मानले