करमाळासोलापूर जिल्हा

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने हमालांसाठी महत्वपूर्ण निर्णय

 प्रतिनिधी सुनिल भोसले


करमाळा तालुका क्रषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने हमालांना हमालीत 25 टक्के वाढ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय संचालक म॔डळाच्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती सभापती प्रा शिवाजीराव बंडगर यानी दिली . दि 29. जानेवारी रोजी बाजारसमितीच्या करमाळा येथील सभागृहात सभापती बंडगर यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी दोन वाजता मिटींग संपन्न झाली . त्यात हा हमाली वाढीचा निर्णय घेण्याची सूचना म्हणून गटनेते दिग्वीजय बागल यानी मांडली तर यास अनुमोदन उपसभापती चिंतामणी दादा जगताप यानी दिले .

हमालांना घसघशीत 25 टक्के हमाली वाढ मिळाल्याने हमालांमध्ये आन॔दाचे वातावरण निर्माण झाले आहे. हमाली वाढ करणेचा विषय दर तीन वर्षातून एकदाच नियमानुसार संचालक मंडळासमोर येतो . त्यानुसार आज हा निर्णय घेण्यात आला . तसेच या निर्णयाबरोबरच आगामी वर्षाचा अर्थसंकल्प सादर करणे , कर्मचारी केलेला सेवा नियमांच्या भंगाबाबत चौकशी समिती नेमणे, आदि विषय एकमताने मंजूर करण्यात आले .

या बैठकीस संचालक आनंदकुमार ढेरे, रंगनाथ शिंदे, संतोष वारे,सरस्वती केकान, अमोल झाकणे, वालचंद रोडगे, शैला लबडे, मयुर दोशी, विजय गुगळे, दादा मोरे,सदाशिव पाटील आदि उपस्थित होते. सूत्र संचलन सचिव सुनील शिंदेंच्या यांनी केले

कृषी उत्पन्न समिती सभापती व संचालक मंडळाने 25% हमाली दरवाढ करून कष्टकरी वर्गाला न्याय दिला हा हमाल तोलार यासाठी चांगला निर्णय संचालकांनी एक मुखी घेतला त्याबद्दल सभापती व संचालक मंडळाचे मी ‌ हमाल पंचायत अध्यक्ष या नात्याने आभारी आहे यापुढेही हामालाचे जीवनमान पाहून त्यांच्या हिताचे निर्णय घेऊन आधार द्यावा तसेच भविष्य काळामध्ये हमाल व कष्टकरी वर्गाला न्याय मिळवून देण्यासाठी मी कट्टीबंद राहणार आहे.

– हमाल पंचायत अध्यक्ष अँड राहुल सावंत.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE